अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे पदावर पूर्ववत कायम.
गुरुवार, 10 सितंबर 2026
Comment
• अप्पर विभागीय आयुक्त नागपूरच्या आदेशानुसार स्थगिती.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :-- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ येथील सरपंच शिवशंकर शेगोजी मुंगाटे यांना अप्पर जिल्हाधिकारी जाधव भंडारा यांनी 9 सप्टेंबर 2026 ला आदेश पारित करून सरपंच पदावरून अपात्र ठरविले होते.
परंतु 10 सप्टेंबर 2026 च्या आदेशानुसार अप्पर विभागीय आयुक्त तुषार मठकर नागपूर विभाग नागपूर यांच्या आदेशानुसार सरपंच शिवशंकर शेगोजी मुंगाटे यांना पदावर कायम ठेवण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 16 (2) अंतर्गत अपिलार्थी यांनी अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव भंडारा यांनी प्रकरण तक्रार अर्ज क्रमांक 12 /69/ 2026 मध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी पारित केलेल्या आदेशाने व्यथित होऊन या न्यायसनापुढे अपील व स्थगिती करिता अर्ज सादर केलेला आहे.
प्रकरणात दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी स्थगिती अर्जावर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीस अपिलार्थी त्यांच्या सुविधे अधिवक्त्यासह उपस्थित होते. गैर अपिलार्थी क्रमांक 1 यांच्यासाठी अँड श्री अमित त्रिपाठी यांनी कॅव्हेट दाखल केले आणि तेही सुनावणीच्या वेळेस उपस्थित राहिले . स्थगिती अर्जाचे अनुसंगाने मौखिक युक्तिवाद करण्यात आला. अपिलार्थी यांनी केलेला मौखिक युक्तिवाद दाखल केलेली कागदपत्रे यांचा विचार करता अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांचे आदेशास कनिष्ठ न्यायालयाचे कागदपत्र प्राप्त होईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.
अपीलार्थी यांनी गैरअपिलार्थी क्रमांक 1 ते 5 यांना नोटीस तसेच अपील प्रत बजावणी करून पुढील सुनावणीच्या वेळी टपाल विभागाची पावती व ट्रक रिपोर्ट सह अहवाल सादर करण्यास आदेशित करण्यात येत आहे. सदर प्रकरणात पुढील सुनावणी दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे.
0 Response to "अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे पदावर पूर्ववत कायम."
एक टिप्पणी भेजें