-->
सेंदूरवाफा येथे ८१ वर्षांची श्रावणमास दिंडी परंपरा उत्साहात.

सेंदूरवाफा येथे ८१ वर्षांची श्रावणमास दिंडी परंपरा उत्साहात.

• आ.नाना पटोले यांच्या हस्ते भजनी मंडळाचा सत्कार.

• भजन व कप सेंदुरवाफा सप्टेंबर २०१० नानाभाऊ पटोले साकोली विधानसभा क्षेत्र गत !..

युगांतर बारसागडे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली/सेंदूरवाफा :- येथील श्री सार्वजनिक हनुमान

मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेलवाहिनी व श्रावणमास दिंडी महोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मागील तब्बल ८१ वर्षांपासून सुरू असलेली श्रावणमास दिंडीची परंपरा आजही गावकऱ्यांकडून श्रद्धेने व उत्साहाने जपली जात आहे.

श्रावण महिन्याच्च्या संपूर्ण कालावधीत सकाळी मंदिरात भगवान शिवाच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचा धार्मिक कार्यक्रम, तर सायंकाळी दिंडी, भजन व आरती अशा भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या प्राचीन परंपरेत गावातील विविध भजनी मंडळे, महिला मंडळ, बालगोपाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात.

दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष समारोपिय कार्यक्रमात आ. नाना पटोले यांच्या हस्ते अनेक वर्षांपासून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या या सर्व सहभागी भजनी मंडळांचा शाल व श्रीफळ देऊन तसेच दिंडीमध्ये सहभागी झालेल्या बालगोपालांचाही रोख रक्कम व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे भजनी मंडळे, ज्येष्ठ भजनी मंडळी तसेच बालगोपालांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना पटोले तर प्रमुख अतिथी म्हणून लाखनी खरेदी विक्री

महासंघाचे संचालक मार्कंडराव भेंडारकर, माजी सभापती पद्माकर गहाणे, सार्वजनिक हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कापगते, नगरसेवक कुणाल राऊत, माजी जि. प. सदस्य अशोक कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. सेंदूरवाफा येथील ही ८१ वर्षांची ही आगळीवेगळी परंपरा कौतुकास्पद असून जुन्या परंपरा, संस्कृती आणि भक्तीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचे मत आ. पटोले यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी 'कापगते पाटील वंशवृक्ष सेंदूरवाफा' हे पुस्तक पटोले यांना भेट देण्यात आले. आपल्या पूर्वजांचा इतिहास, वंशपरंपरा आणि सामाजिक-सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने व पुढील पिढीला आपल्या वंशाचा इतिहास व परंपरा समजण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल असे मत त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास महिला मंडळ, विविध भजनी मंडळांचे सदस्य, बालगोपाल, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. शेवटी उपस्थित मान्यवर, भजनी मंडळे, महिला मंडळ, बालगोपाल आणि सर्व ग्रामस्थांचे आभार मानून बेलवाहिनी व श्रावणमास दिंडी महोत्सवाची सांगता करण्यात आली.

0 Response to "सेंदूरवाफा येथे ८१ वर्षांची श्रावणमास दिंडी परंपरा उत्साहात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article