बिरसा मुंडा चौक सेंदूरवाफा येथे तान्हा पोळा.
मंगलवार, 15 सितंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
साकोली/सेंदूरवाफा :- हनुमान मंदिर बिरसा मुंडा चौक येथे पारंपरिक पद्धतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बालगोपाल उत्साहाने लाकडी नंदीबैल सजवून व वेशभूषा धारण करून आलेले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महादेव पिंडी व नंदी महाराज व बालगोपाळांनी आणलेल्या नंदीबैलाची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांना प्रोत्साहन म्हणून नोटबुक व संतचरित्रांचे पुस्तक बक्षिसे देण्यात आली. बालगोपालांचा उत्साह वाढविण्यासाठी ग्रामस्थांनीही मोठ्या
संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
यावेळी नगराध्यक्षा देवश्री कापगते, नगरसेवक पुष्कर करंजेकर, नगरसेवक राजेंद्र पोगडे, माजी नगरसेवक मनिष कापगते, से. नि. शिक्षक गिरीश इळपाते, के. डी. अतकरी, रामू कापगते व विनोद उईके, दुधराम डोंगरवार, से.नि. केंद्रप्रमुख रजनी करंजेकर, चंदा पोगडे, से.नि.शि. रूपाली इळपाते, अरुणा कापगते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुपम इळपाते, पंकज, प्रविण कापगते, आशिक राऊत तसेच मित्र परिवार यांनी परिश्रम केले.
0 Response to "बिरसा मुंडा चौक सेंदूरवाफा येथे तान्हा पोळा."
एक टिप्पणी भेजें