-->
पातुर गणेश उत्सव निमित्ताने पोलीस स्टेशन चानी हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक.

पातुर गणेश उत्सव निमित्ताने पोलीस स्टेशन चानी हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक.



        गुलाबभाऊ अंभोरे
साप्ताहिक "जनता की आवाज"  

 पातुर :- तालुक्यातील पोलीस स्टेशन चांनी चे दबंग ठाणेदार धनराज देवर्जन कर यांनी गणेशोत्सव चांगल्या तऱ्हेने पार पडावा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन चांनी हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेतली.

 सर्वप्रथम नवीन ठाणेदारांची नुकतीच नियुक्ती झाली याबद्दल पोलीस पाटील महिला अध्यक्ष लताबाई चव्हाण पाटसिंगी यांनी ठाणेदार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच दादाराव वांडे सुकळी , गजानन भाऊ रोकडे लावखेड, माजी पोलीस पाटील विवरा भुजंगराव देशमुख, चंद्रभान शिंदे बल्लाळी, संजय देवकते पांडुरना , च तारी विजय भाऊ सदार, कदम सोनुना, दिग्रस नितीन गवई., इत्यादी पुरुष आणि महिला पोलीस पाटील. हजर होतेे.

 ठाणेदार यांनी पोलीस पाटील यांचा परिचय घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. मिरवणूक मध्ये डीजेचा आवाज मर्यादित असावा. त्याबद्दल गावातून कोणतीही तक्रार नाही पाहिजे. मिरवणूक मध्ये शांतता राखावी वेळेच परमिशनचे भान ठेवून काळजी घ्यावी. आणि गावा गावातील असलेले अवैध धंदे , वरली मटका, गावठी दारू, देशी दारू, जुगार, गावातील गुंडगिरी लोक , दहशत फैल्विनारे , असा कायदा कोणीही हातात घेऊ नका अशा प्रकारे ठाणेदार यांनी मार्गदर्शन केले.

0 Response to "पातुर गणेश उत्सव निमित्ताने पोलीस स्टेशन चानी हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article