नहरात वयोवृद्ध महिलेचा शव मिळाल्याने खळबळ...
शुक्रवार, 18 सितंबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मोहाडी :- प्राप्त माहिती अनुसार तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथील पेंच च्या नहरात आज 18 सप्टेंबर सायंकाळ सहा वाजता महिलेचा शव मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर शव काढण्यात आले व मृतक महिला ही धुसाळ्याची विमल तुकाराम सोनवाने वय (80) असुन ती घरुन बारावाजे निघाली होती, या अगोदर ही ती अनेकदा घर सोडुन गेली असल्याची माहिती मिळाली पोलीसांनी शव काढले व शवविच्छेदना करिता नेण्यात आल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करत असल्याची माहिती आहे.
0 Response to "नहरात वयोवृद्ध महिलेचा शव मिळाल्याने खळबळ..."
एक टिप्पणी भेजें