-->
भारतीय किसान संघाची सुधीर मुनगंटीवार यांचेशी भेट..

भारतीय किसान संघाची सुधीर मुनगंटीवार यांचेशी भेट..


• धान बोनस संदर्भात सहकार्याचे दिले आश्वासन.

         युगांतर बारसागडे
 "साप्ताहिक जनता की आवाज"

साकोली/सेंदूरवाफा :- भारतीय किसान संघ विदर्भ प्रांततर्फे माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपुर येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालयात धान बोनस या विषयांवर भेट घेतली. 
.            भारतीय कीसान संघाचे कार्यकर्ते 

पूर्व विदर्भातील सर्व पक्षीय आमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी बैठक घेऊन शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा बोनसचा प्रश्न मार्गी लावावा अशी मुनगंटीवार यांना विनंती करण्यात आली.यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत आपण यावर सर्व मिळून मार्ग काढू असे आश्वासन दिले.

या वेळी भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री खंडेराव कुलकर्णी, नूतन येळे, मारोती राऊत, सुरेंद्र पांडे, दिनेश कापगते, भारत रोकडे, तुकाराम निकुरे, धनंजय बोरकर, अमोल भाकरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

0 Response to "भारतीय किसान संघाची सुधीर मुनगंटीवार यांचेशी भेट.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article