लोक परिवर्तन फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती पहेला येथे संपन्न.
शनिवार, 26 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे लोक परिवर्तन फाउंडेशन तर्फे येणाऱ्या गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती पहेला प्राथमिक आरोग्य केंद्र समोर दिनांक 26 सप्टेंबर 2026 ला घेण्यात आला.
यावेळी लोक परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सावित्रीबाई फुले अभ्यासिका चे व्यवस्थापक रजत केवळ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मीडिया अधिकार मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या मार्गदर्शनात, नवभारत चे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, व दिलीपआकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. व येत्या 2 आक्टोंबर ला सकाळी 8 वाजता वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. करिता समितीतील सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील मान्यवर या सर्वांनी सदर कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे.
0 Response to "लोक परिवर्तन फाउंडेशन तर्फे गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समिती पहेला येथे संपन्न."
एक टिप्पणी भेजें