मोफत आरोग्य तपासणी
शनिवार, 26 सितंबर 2026
Comment
उमेश बोरकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/सातलवाडा :- उपकेंद्र सातलवाडा पीएचसी खांबा अंतर्गत आज दिनांक 19 सप्टेंबर ला श्री गणेश बाल नवयुवक मंडळ (माता चौक) सातलवाडा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरा ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी रक्तदाब ( Blood Pressure) व रक्तातील साखरेची (Blood Sugar) तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिर म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागातील गरजू लोकांपर्यंत मोफत किंवा कमी खर्चात वैद्यकीय सेवा, रोगनिदान आणि आरोग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचे एक विषेश माध्यम आहे.
या शिबिराचे महत्त्व म्हणजे आजार गंभीर होण्यापूर्वी मधुमेह उच्च रक्तदाब व इतर विकारांचे प्राथमिक टप्प्यात निदान करणे. शिबिरामध्ये एएनएम अंतकला पुराम मॅडम, चंदा आर. लेदारे मॅडम, मोनाली गणवीर आशा सेविका, वंदना फुन्हे आशा सेविका यांनी रक्तदाब (Blood Pressure) व रक्तातील साखरेची (Blood Sugar) ग्राम वासीयांची आरोग्य तपासणी केली. शिबिरामध्ये गावातील 30 वर्षापासून ते 70 वर्षा पर्यंतच्या पुरुष व महिलां लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
या मध्ये महाराष्ट्र 24 मराठी न्यूजचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी उमेश बोरकर, गोपीचंद कन्हाके, गायत्री कन्हाके, कौसल्या रहांगडाले, कल्पना बोरकर, खिरफुला बोरकर, कौसलनाथ राहंडाले, कल्पना गजभिये, रेषमा गजभिये, निशा मेश्राम, रत्नमाला वंजारी, दिशा खांडेकर, दिनेश रंगारी, विमलाबाई मेश्राम, मधुमाला गजभिये आणि अनेक ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
0 Response to "मोफत आरोग्य तपासणी "
एक टिप्पणी भेजें