आरक्षण व बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर राज्यव्यापी अभियान.
मंगलवार, 1 सितंबर 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- जनगणना २०२७, डॉ. बाबासाहेब आरक्षण, आंबेडकरांच्या चळवळीशी संबंधित विविध पैलू तसेच समाजाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्यात भंडारा येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या अभियानांतर्गत जनगणना २०२७ मध्ये बौद्ध धर्मीय व अनुसूचित जातींची अचूक आकडेवारी नोंदविणे, जातीय आधारावरील भेदभावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती-जमाती व इतर घटकांना आवश्यक असलेल्या संवैधानिक आरक्षणाबाबत जनजागृती करणे, बौद्ध अल्पसंख्यांक व अनुसूचित जातींच्या समस्यांवर चर्चा करणे तसेच संवैधानिक तरतुदी, विविध धोरणे व योजनांची प्रभावी
अंमलबजावणी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी बौद्ध धम्माचा स्वीकार सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येईल. कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता, इंद्रलोक सभागृह, राष्ट्रीय महामार्ग, भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी अभियानात प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान नागपूरसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, संविधान बचाव संघर्ष समिती, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भारत तिबेट बुद्धिस्ट मैत्री संघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना, कास्ट्राईक कर्मचारी संघटना, स्वतंत्र मजदूर युनियन, बौद्ध विहार समन्वय समित्या, सर्व बुद्ध विहार व इतर सामाजिक संस्थांचा सहभाग आहे. बौद्ध बांधव-भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभघ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Response to "आरक्षण व बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर राज्यव्यापी अभियान."
एक टिप्पणी भेजें