अविरामाचा तो एक सल्ला,(उपदेश)
मंगलवार, 1 सितंबर 2026
Comment
जो पाळला तर नात्यांमधील अर्ध्या समस्या संपतील..
संकलन/संग्रहक: - हर्षवर्धन देशभ्रतार.
महाभारतात श्रीकृष्णाने एक खूप साधी पण मोठी गोष्ट सांगितली होती, "अपेक्षा कमी ठेवा आणि कर्तव्य जास्त करा." आज आपण नात्यांमध्ये जास्त त्रास का घेतो, कारण आपण देण्यापेक्षा अपेक्षा जास्त ठेवतो. आपण प्रेम करतो, काळजी घेतो, पण बदल्यात तसंच काहीतरी मिळावं ही अपेक्षा ठेवतो. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा मन दुखावतं. श्रीकृष्ण सांगतो, "तू तुझं कर्तव्य करत राहा, पण त्याच्या बदल्यात काही अपेक्षा ठेवू नकोस." कारण जिथे अपेक्षा वाढतात, तिथे दुःख सुरु होतं. नातं टिकवायचं असेल तर मोजमाप करु नका, "मी इतकं केलं, त्याने काय केलं?" असं विचारणं थांबवा. मनापासून करा आणि सोडन द्या. कारण खरं नातं तेच असतं, जिथे हिशोब नसतो. आणि जिथे हिशोब सुरु होतो, तिथे नातं संपायला सुरुवात होते.
0 Response to "अविरामाचा तो एक सल्ला,(उपदेश) "
एक टिप्पणी भेजें