-->
देशातील सैनिकांना प्रोत्साहन देण्याची गरज - महिला अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर.

देशातील सैनिकांना प्रोत्साहन देण्याची गरज - महिला अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर.


• धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रमांतर्गत पंजाब बॉर्डर पोहचल्या राख्या व संदेशरुपी पत्र. 
          संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून सिमेवर सदैव तैनात असल्याने आपण सर्व आनंदाने जिवन जगत असतो. सैनिक बांधव उन, वारा, पाऊस व हिमवर्षा इत्यादींची तमा न बाळगता देश संरक्षणाचे कार्य असतात. त्यांना बहिणीची उणीव भासू नये म्हणून म्हणून विद्यार्थिनींनी पत्ररूपी संदेश व मनगटावर राखी बांधण्याचा 
अभिमव उपक्रम सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. म्हणून देशातील सैनिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे प्रतिपादन महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर यांनी केले.
        त्या महिला शिक्षण प्रसारक मंडळ भंडारा व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेड रिबीन क्लब भंडारा द्वारा संचालित महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत बिरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राध्यापक विनोद चव्हाण, प्राध्यापक गणेश किरसान उपस्थित होते.
           धागा शौर्य का, राखी अभिमान की हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भारतीय जवान अहोरात्र कर्तव्य बजावत असून देशाचे रक्षण करत असतात. त्यांनी विद्यार्थिनींना राखीचे महत्त्व केजरकर यांनी पटवून दिले. या उपक्रमातंर्गत विविध शाळांमधून त्यांनी जवानांना राख्या पाठवण्याचे मोलाचे कार्य हाती घेतले आहे. धागा शौर्य का, राखी अभिमान की' या उपक्रम बद्दल माहिती तसेच राखीचा धागा हा प्रेमाचा प्रतीक आहे. असे महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर यांनी समजावून सांगितले. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या आपल्या भारतीय जवानांना पाठविण्यात आल्या होत्या त्या आज पंजाब बॉर्डर पोहचल्या राख्या व संदेशरुपी पत्र पोहचल्याची माहिती सैनिकांनी दिली आहे.
       त्यात महिला अध्यापक महाविद्यालय, नूतन कन्या विद्यालय, पावा नवीन मुलींची शाळा, जे. एम. पटेल महाविद्यालय, महिला समाज विद्यालय, अश्विनी स्कूल ऑफ एक्सेलन्स, जिजामाता विद्यालय च्या विद्यार्थिनींनी भारतीय जवानांना स्नेहरूपी राख्या पाठवून सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचे उत्तर सैनिकांनी सर्व सहभागी चिमुकल्या बहिणीचे आभार मानले. व आई-वडिलांची व स्वत:ची काळजी घेऊन अभ्यास करून स्वताचे नाव लौकिक करावे. असा संदेश दिला. 
        त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी छात्रध्यापक विद्यार्थिनींना विविध मार्मिक उदाहरण देऊन सविस्तर मार्गदर्शन केले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राखडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शुभांगी देशमुख यांनी मानले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी मनोज टेकाम, ईशा साठवणे, स्नेहा शेंडे, चैतन्या तितीरमारे, रुचिका सय्याम, वैष्णवी नैनपुरकर, निकिता कान्हेकर, आराज्ञा मेश्राम, प्रांजली मारवाडे, मयुरी येळणे, पल्लवी गभणे, साक्षी भलावे, शुभांगी धांडे, साक्षी साखरे, पलक मडावी, श्रृती शेंडे, माईसा केवट, संजना बहिरे, स्नेहा सार्वे, कल्याणी जिभकाटे, मयुरी नागोसे, आचल गिदमारे, हिमांशी भाजीपाले, समिक्षा घरडे, मेघा भोयर, साहीली रहांगडाले, समिक्षा टांगले, अभिज्ञा कोंटागले, वैशाली समरित व हिमांशी भाजीपाले,‌ महिला ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी छात्रध्यापक विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

0 Response to "देशातील सैनिकांना प्रोत्साहन देण्याची गरज - महिला अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article