-->
आमसभा',विद्यार्थी गुणगौरव समारंभ.

आमसभा',विद्यार्थी गुणगौरव समारंभ.


 • 75 वर्ष त्यावरील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सत्कार संपन्न.
 
          संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- बावणे कुणबी समाजसेवा मंडळ जिल्हा भंडारा येथे येथे दि. 30/ 8/ 2026 रविवारला सकाळी 10:30वाजता "आमसभा" सदानंद इलमे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रथम समाजातील वर्षभरात दिवंगत झालेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज, व राजे छत्रपती शिवाजी महाराज,आणि महाबली पराक्रमी व दानसूर,बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेचे पूजन व माल्याँपन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आमसभेची प्रस्तावना के. झेड. शेंडे यांनी केले अहवाल वाचन सचिव महेश कुथे त्यात मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे,जमाखर्च नफा-तोटा व ताळेबंद, प्रश्न उत्तरे अध्यक्ष सदानंद यांनी दिले या आमसभेचे संचालन मनोज बोरकर यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार दिनेश फेंडर यांनी मानले. सत्र दुसरे विद्यार्थी गुणगौरव समारंभ 75 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त मान्यवरांच्या सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पडोळे, खासदार भंडारा/ गोंदिया निर्वाचन क्षेत्र, प्रमुख मार्गदर्शक, काशीराम मते माजी अप्पर आयुक्त सहकार क्षेत्र महारष्ट्र राज्य
 सदानंद इलमे अध्यक्ष बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडारा एकनाथ फेंडर उपाध्यक्ष जि.प.भंडारा नरेश ईश्वरकर सभापती शिक्षण व बांधकाम जि.प.भंडारा नागेश भगत उपसभापती पंचायत समिती भंडारा सुभाष बोरकर उपसभापती पंचायत समिती तुमसर.

चंद्रकला भोपे उपाध्यक्ष न.प. भंडारा प्रीती गाढवे सभापती शिक्षण व क्रीडा न.प.भंडारा, देवेंद्र इलमे सदस्य जि.प.भंडारा, दिलीप सारवे सदस्य जि. प.भंडारा, राजेंद्र ढबाले सदस्य जि. प.भंडारा, ऋतुजा पडोळे सदस्य न.प.भंडारा मंगला डहाके रोशनी पडोळे उमेश मोहतुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन दुसऱ्या सत्रात एँड मधुकर बांडेबुचे यांना सन 2025 च्या "समाज भूषण" पुरस्कार देण्यात आले स्वाती शेलोकर ,कवित्री यांच्या विद्रोह या कविता संग्रह पुस्तकाचे विमोचन खासदार प्रशांत पडोळे व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले समाजातील कु. अंजली काळे ही वर्ग 10वी मध्ये भंडारा जिल्ह्यातून प्रथम आली तिला 99:50 %गुण मिळालेत,कु.सानवी खराबे वर्ग 10वी, 97.10/%,कु.अवनी तितरमारे वर्ग10वी95:70%
,कु.संस्कृती सत्यम बांते वर्ग10वी 95%, कु.मृणाली मने वर्ग 10वी 95% व वर्ग12वी, वर्ग 6वी, वर्ग8वी शिष्यवृत्ती प्राविण्य प्राप्त एमबीबीएस तसेच एन आय आय टी, राज्य व राष्ट्रीय स्थरावर खेळणारे खेळाडू यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला समाजातील 67 विद्यार्थ्यांनी पुरस्कार प्राप्त केले (देण्यात आले) 75 वर्ष त्यावरील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त मान्यवरांचा सत्कार 32 समाजातील व्यक्तींना शाल श्रीफळ गुलाबाचे फुल देऊन खासदार पडोळे व मान्यवरांच्या हस्ते यांच्या सत्कार करण्यात आले.

 प्रमुख मार्गदर्शक काशीराम मते म्हणाले की समाजातील हुशार विद्यार्थीची संख्या वाढायला हवी जास्तीत जास्त आयएएस व आयपीएस अशा सारख्या मोठा पदावर जायला हवे, त्यासाठी चिकाटी जिद्द मेहनत व स्वप्न मोठे स्वप्ने आवश्यक आहे असे मत व्यक्त केले खासदार प्रशांत पडोळे म्हणाले की मंडळाचे हे सातत्याने समाजाच्या हिताचे काम करतात तसेच समाज प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट कार्यक्रम राबविले जातात त्याबद्दल त्यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहेत विद्रोह पुस्तकाचे विमोचन करताना म्हणाले की समाजाच्या व ओबीसीच्या कार्यकर्त्या स्वाती शेलोकर यांनी लिहिलेल्या विद्रोह या कविता संग्रहाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. पडोळे यांनी कवितासंग्रहातील कविता समाज प्रबोधक करण्यात मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदानंद इलमे अध्यक्ष बावणे कुणबी समाज मंडळ भंडारा यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बोरकर व अंजली बांते यांनी केले. तर आभार प्रदर्शन अरुण झंझाड यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू दाजी जगनाडे महेश कुथे सूर्यकांत ईलमे, प्रभाकर पाटेकर,विवेक पडोळे, मधुकर चौधरी, रुपेश टांगले दिनेश फेंडर, नरेश बोंद्रे, आनंद बाभरे ,अनिता बोरकर, सुबदा झंजाड,मीरा टिचकुले, यांनी अथक परिश्रम घेतले.

0 Response to "आमसभा',विद्यार्थी गुणगौरव समारंभ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article