ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे संचालकावर तुमसर पोलीसांची कारवाई.
सोमवार, 14 सितंबर 2026
Comment
• सार्वजनिक गणेश उत्सव ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी रुग्ण यांना ध्वनी प्रदूषणामुळे कोणतीही आणि नव्हता पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्याची आव्हान.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- दि.14/09/2026 सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मा जिल्हाधिकारी सा भंडारा यांचे कार्यालयीन अध्यादेश क्र. अका/दंड-1/कावि-345/2026 दि 04/09/2026 अन्वये सण उत्सवामध्ये कर्णकर्कश सांउड डॉल्बी डिजे सिस्टीम वर तसेच वाहतुक करणारा वाहनावर बंदी असल्याबाबतचा अध्यादेशाचे उल्लंघन होतांना दिसुन आल्याने संबंधित डॉल्बी डिजे संचालकावर तुमसर पोलीसांकडुन कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर प्रकरण असे की, दि. 12/09/2026 रोजी रात्री 20/00 वा डॉल्बी डिजे मालक हिमेश रामजी राणे वय 24 वर्ष रा. मीठेवानी तुमसर ता तुमसर जि. भंडारा याने त्याचे मालकीचा डॉल्बी डिजे तुमसर येथील श्री. गणेश आगमन मिरवणुकी निमीत्त वाजविण्यात येत होते दरम्यान सदर मंडळाचे गणपती मिरवणूक ही कोडवानी दवाखाना हॉस्पीटल जवळ आली असता तसेच सदर डि जे चा आवाज कर्णकर्कश तसेच जोर जोराने असल्याच्या गोपनीय माहीतीवरून पोलिस स्टेशन तुमसर येथील ध्वनीप्रदुषण नियंत्रण पथक सदर ठिकाणी सोबत कॅसीलो कपंनीचे सॉउड लेवल मिटर घेवुन पोहचले व सर नॉईस लेव्लल मिटरने डिचेच्या आवाजाची तिव्रता मोजली असता मशीन मध्ये L-Aeq 89.9 db दिसून आल्याने डीजे साऊंड सिस्टिमची ध्वनी पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. सदर डिजे च्या संचालकाकडुन ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी संबंधित डीजे चालक/मालक यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० आणि इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली असून डीजे साऊंड सिस्टिम जप्त करुन पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सदर ची कारवाई मा. श्री नूरुल हसन पोलीस अधिक्षक सा. भंडारा, मा. श्री. निलेश मोरे अपर पोलीस अधिक्षक सा. मा. श्री, शिवम विसापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी सा. उपविभाग तुमसर, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. सुभाष बारसे ठाणेदार पो. स्टे. तुमसर यांचे आदेशान्वये पो. स्टे. तुमसर येथील पो. नी. बाळासाहेब आघाव, तसेच ध्वनी प्रदुषण नियंत्रण पथकातील पोउपनी प्रविण सयाम, पो. शी. नामदेव बळदे, पो. शी. चेतन कुरंजेकर, पोशी. तिलक चौधरी, मपोशी प्रिती कडव यांनी केलेली आहे.
नागरिकांनी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान ध्वनीवर्धकांचा वापर करणे टाळावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तुमसर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आला आहे.
आवाहन :
ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो. सार्वजनीक गणेश उत्सव साजरे करतांना पर्यावरणपुरक व पारंपारीक पध्दतीने साजरा करावा. त्यामुळे सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत सहकार्य करावे व कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास त्वरित पोलीसांना माहिती द्यावी.
0 Response to "ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे संचालकावर तुमसर पोलीसांची कारवाई."
एक टिप्पणी भेजें