जिजाऊ महिला सहकारी पत संस्था म . चिचाळ ची वार्षिक आमसभा संपन्न.
रविवार, 27 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिजाऊ महिला सहकारी पत संस्था चिचाळ ची वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोज शनिवार ला साजरी करण्यात आली सर्वप्रथम माँ जिजाऊ. सावित्रीबाई फुले. अहिल्याबाई होळकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली.
सर्व संचालिका आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक मा नंदपुरे सर यांनी केले मनोगत अध्यक्षा सौ मनिषा नंदपुरे तर अहवाल वाचन व्यवस्थापक आकाश घटारे यांनी केले चुनिलाल लांजेवार यांनी मार्गदर्शन केले मा भास्कर नंदनवार साहेब सहकार अधिकारी यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमास अमित रणदिवे पत्रकार, संचालिका मंजुषा गभने, लक्ष्मी डोकरे, सुनंदा नंदपुरे, धनश्री लोहकर, अल्का शास्त्रकार, सुजाता रामटेके, वर्षा जिभकाटे, रेखा शेंद्रे .आणि बहुसंख्येने महिला सभासद उपस्थित होत्या ह्यावेळी वर्ग 10 वी आणि 12 वीत प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी कृष्णा जिभकाटे मीनाक्षी लेंडे अश्विनी भुरे गीता नंदपुरे यांनी सहकार्य केले
0 Response to "जिजाऊ महिला सहकारी पत संस्था म . चिचाळ ची वार्षिक आमसभा संपन्न."
एक टिप्पणी भेजें