विविध उपक्रमशील शिक्षण राबवणाऱ्या आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र कोचे यांचा सन्मान सोहळा.
शनिवार, 26 सितंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
साप्ताहिक "जनता की आवाज"
साकोली :- साकोली येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल येथे आदर्श शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र लक्ष्मणराव कोचे यांचा व्हि एस एफ ग्रुप साकोली च्या वतीने सन्मान करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येऊन त्यांच्या ज्ञानात भर पाडून त्यांना विविध क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त गुणवत्ता कशी मिळेल या साठी विद्यार्थासाठी मार्गदर्शन , कलाकौशल्य, व्यक्तीमत्व विकास , स्कॉलरशिप चे क्लास , नवोदय शाळेचे क्लास , एनएमएस चे क्लास शाळेत घेऊन विद्यार्थी नावीन्यपूर्ण कसा करावा यासाठी प्रयत्न करून विद्यार्थीचे व शाळेचे नाव कसे लौकीक होईल यासाठी विशेष प्रयत्न केले जाते.
आणि आज पिमश्री जि. प. हायस्कुल नावलौकिकास पात्र आहे. आणि शाळेची प्रगती ओळखून V SF गृपणे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यासाठी मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे आणि इतर शिक्षकांचा वाटा असुन यात बी .आर. चव्हाण ,एम .वाय .बागडे , एन. जी. बाळबुद्धे ,श्रीमती ए. डी . चौधरी ,कुमारी के .एम . नाकाडे . डी .डी .मसराम , पी .एस .शिंदे , कुमारी सुरभी हुमे 'कुमारी रेवती वाडीकर , अमित डोये ,हिरकन्या झोडे मॅडम ,प्रयागराज बोरकर . सचिन लु ,टे लेखराज वजाडे यांचाही याठिकाणी शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्व शिक्षक , पत्रकार डी. जी. रंगारी यांनी केले . तर आभार रनविर कापगते यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल कापगते, अंकित कापगते, भोजराज कापगते, साकोली मीडिया चे पत्रकार किशोर रंगारी , ऋग्वेद येवले, आशिष चेडगे , युंगातर बारसागडे ,। निलय झोडे , किशोर बावणे तसेच VSF ग्रुपचे दिंगाबर सुर्यवंशी , मनिष झिंगरे आदि पदाधिकारी उपस्थित होते . तसेच शाळेतील विद्यार्थी , पालक हजर होते .
0 Response to "विविध उपक्रमशील शिक्षण राबवणाऱ्या आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री धर्मेंद्र कोचे यांचा सन्मान सोहळा."
एक टिप्पणी भेजें