-->
पिकअपच्या चुकीमुळे टेलर उलटला..

पिकअपच्या चुकीमुळे टेलर उलटला..




दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

• सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

तुमसर :- रामटेक-गोंदिया मार्गावरील तामसवाड़ी व तुडका दरम्यान मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पिकअप वाहनाच्या चुकीमुळे एक टेलर अनियंत्रित होऊन उलटला.
 सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. टेलर गोंदियाच्या दिशेने जात होता. दरम्यान, तामसवाड़ी-तुडका वळणाजवळ एका पिकअप वाहनाच्या चुकीमुळे दोन्ही वाहनांची स्थिती बिघडली आणि टेलर रस्त्याच्या बाजूला उलटला. वर्दळीच्या या मार्गावर मोठा अपघात टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

संकेतक बोर्ड लावण्याची मागणी;

तामसवाड़ी ते तुडका जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत असल्याची माहिती समोर येत आहे. रस्त्यावरील वळणे आणि अपघातसंभाव्य ठिकाणांची पुरेशी माहिती वाहनचालकांना मिळत नाही.

0 Response to "पिकअपच्या चुकीमुळे टेलर उलटला.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article