-->
बोगस लाभार्थीनां आळा घालण्यासाठी "मिशन सुधार योजना"

बोगस लाभार्थीनां आळा घालण्यासाठी "मिशन सुधार योजना"




• तुमसरातील 6,864 संशयित व अपात्र लाभार्थ्यांचे अन्नधान्य बंद होणार !..

• "मिशन सुधार" प्रणाली मुळे बोगस लाभार्थीचे धाबे दणाणले.

       दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस आणि अपात्र राशनकार्डधारकांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मिशन सुधार' अभियानांतर्गत तुमसर तालुक्यात मोठी कारवाई सुरू झाली आहे. 
आधार डेटाबेस आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या एकत्रित माहितीची पडताळणी करून तुमसर तालुक्यातील तब्बल ६,८६४ संशयितांचे अपात्र राशनकार्ड वगळण्याची प्रक्रिया तीव्र करण्यात आली असून, या लाभार्थ्यांचे अन्नधान्य बंद होणार आहे.

तुमसर तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजनेचे १४ हजार.

२८८ राशनकार्डधारक असून, त्या कार्डावरील युनिटसंख्या ५२ हजार ५२ आहे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या कार्डाची संख्या ३४ हजार ७५ असून, त्यावरील लाभार्थी संख्या १ लाख ४२ हजार ९६५ इतकी आहे. या व्यवस्थेमध्ये केवळ पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने लाभार्थ्यांच्या माहितीची सखोल पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. ४ ऑगस्ट रोजी प्राप्त यादीनुसार 'मिशन सुधार' कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ६ हजार ८६४ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झालेली असून, या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंतच शासनाचा अन्नधान्याचा लाभ

अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची वर्गवारी..

आधार स्टेटसमध्ये त्रुटी असलेले -७४९, दीर्घकाळ धान्य न उचलणारे -१३२, दुय्यम लाभार्थी - ६७७, आयकर भरणारे-४,३९८, कंपनी संचालक असलेले - ३२२, वार्षिक उत्पन्न २० लाखांपेक्षा अधिक असलेले -२४३, शंभर वर्षांहून अधिक वयाचे -३१९, चारचाकी वाहन असलेले - ०३, टपाल विभागातील - १४, कुटुंबातील एक सदस्य असलेले -०४, इतर - ०३.पोहोचण्यास मदत होणार असून बोगस

प्रशासनचे महत्त्वपूर्ण आवाहन..

ज्या लाभार्थी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास, स्वतःचे चारचाकी वाहन असल्यास किंवा आयकर भरत असल्यास, त्यांनी तातडीने त्यांचे राशन कार्ड 'शुभ्र शिधापत्रिकेमध्ये' (पांढरे राशन कार्ड) रूपांतर करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभाग, तहसील कार्यालय तुमसर मार्फत तहसीलदार उपेश अंबादे तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रविण अंबुलकर यांनी केले आहे.
लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

0 Response to "बोगस लाभार्थीनां आळा घालण्यासाठी "मिशन सुधार योजना""

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article