आमरण उपोषणाला कामगार संघटनेचा पाठिंबा.
मंगलवार, 1 सितंबर 2026
Comment
• बेमुदत आमरण उपोषणाचा ११ वा दिवस.
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेली राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करणे. व इतर मागण्यांच्या संदर्भात अमर कला सांस्कृतिक संघटना व कलावंतांचे ५ दिवसांपासून बेमुदत आमरण आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात सुरू आहे. या आमरण उपोषणाला बहुउदेशीय कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पाठिंबा दिला आहे.
अमर कला सांस्कृतिक संघटनेचे कलावंतांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे की, जिल्ह्यात नव्याने राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती तयार करण्यात आलेली आहे. परंतु या निवड झालेल्या समिती मध्ये एकही सदस्य कलावंत नाहीत. निवड झालेले सदस्य हे कुठल्याही कला मंचांचे कलावंत नाहीत तर हे काय वृद्ध कलावंतांच्या हिताचे निर्णय घेतील.
भंडारा जिल्हा हा कलावंताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात सर्वस्तरीय कलाकार आढळतात, त्यामुळेच वृद्ध कलावंतांची या ठिकाणी निवड झाली पाहिजे. या निवड समितीमध्ये जेष्ठ व तज्ञ लोक कलावंतांना या निवड समितीमध्ये स्थान मिळायला पाहिजे. जेणेकरून हे खव्या वृद्ध कलावंतांना निवडून त्यांना न्याय देतील.
पण या ठिकाणी कलावंत कमी व राजकीय लोकांचा प्रचंड प्रमाणात भरणा असल्यामुळे हे लोक बोगस कलावंतांची आर्थिक देवतण-घेवाण करीत असतात. असा प्रकार जिल्ह्यात घडलेला आहे. हाा समितीमध्ये पुन्हा दोन सदस्यांची नियुक्ती झालेली आहे की, त्यांनी मागील वेळी आर्थिक व्यवहार करून बोगस कलावंतांची निवड केलेली आहे. अशा भ्रष्टाचारी व्यक्तींना या समितीमध्ये निवाड करणे योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू व खरे कलावंत या योजनेपासून वंचित राहतील. मागील वा सदर विषयांचे निवेदन व सखोल चर्चा सुद्धा केलेली असून सुद्धा पुन्हा जिल्ह्यात तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
जर कलावंतांच्या मानधन योजनेत होणारा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर नव्यांने स्थापन झालेली समिती बरखास्त करावी लागेल व जिल्हाातील प्रव्येक तालुक्यातील तज्ञ कलावंत लोकांची नियुक्ती २० दिवसांच्या आत करण्यात यावी. व नव्यांने निवड.
जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेली राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत निवड समिती बरखास्त करणे.
निवड झालेले सदस्य कलाकार आहेत की नाही याची चाचणी करणे.
प्रलंबित असलेली सन २०२५ ते २०२६ ची मिटिंग घेण्यात येऊ नये.
इत्यादी मागण्यांच्या संदर्भात बेमुदत आमरण आंदोलन सुरू आहे.
निवेदन देताना माधुरी घोडमारे (अध्यक्ष, महिला आघाडी), वंदना कोहळे, शाहीर अंबादास नागदेवे, अचल मेश्राम, नितीन गजभिये, मनोज खोब्रागडे, युगांतर बारसागडे हर्षवर्धन देशभ्रतार,इ.कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "आमरण उपोषणाला कामगार संघटनेचा पाठिंबा."
एक टिप्पणी भेजें