-->
महानुभाव ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आचार्य श्रीपुजदेकरबाबा.

महानुभाव ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आचार्य श्रीपुजदेकरबाबा.



 माहूरपीठाधीश श्रीमाहूरकरबाबा शास्त्री यांचा अभीष्टचिंतन सोहळा.


हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर/भंडारा :- महानुभाव पंथातील साहित्य परमेश्वरापर्यंत नेणारे आहे. महानुभाव साहित्यातील ग्रंथसंपदा नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे, असा विश्वास उपाध्यकुलभूषण आचार्य श्रीपुजदेकरबाबा, घोटी (नाशिक) यांनी व्यक्त केला.

महानुभाव पंथ माहूरकरबाबा, श्रीकारंजेकरबाबा यांच्यासारख्या महनीय व्यक्तींच्या कार्यामुळे एव्हरेस्ट शिखरापर्यंत पोहोचेल, माहूरकरबाबांचा कर्मयोग साहित्य क्षेत्रातूनही प्रकट झाला असून तो सत्याकडे घेऊन जाणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.

माहूरपीठाधीश कविश्वराचार्य श्रीमाहूरकरबाबा शास्त्री यांच्या पासष्टीपूर्तीनिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात रविवारी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविताना त्यांनी आपले ज्ञान पंथासमोर मांडले. व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे कार्याध्यक्ष उपाध्यकुलाचार्य श्रीबीडकरबाबा, रणाई उद्घाटक म्हणून उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष कवीश्वरकुलाचार्य आचार्य श्रीकारंजेकरबाबा, अमरावती यांनी कार्याध्यक्षपद भूषविले.

परिषदेचे माजी अध्यक्ष कवीश्वरकुलाचार्य श्रीविद्वांसबाबा शास्त्री, फलटण यांच्या हस्ते ग्रंथाचे

प्रकाशन आणि रिद्धपूरकरबाबा शास्त्री, अजिंठा आणि गोपीराजबाबा शास्त्री, रिद्धपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, अर्चन, टिळा, हार, संत पोशाख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन श्रीमाहूरकरबाबा शास्त्री यांचा गौरव करण्यात आला. मुख्य अतिथी म्हणून उपाध्यआम्नाय श्रीन्यायंबासबाबा शास्त्री, मकरधोकडा, तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्याचार्य श्रीबाभूळगावकरबाबा शाखी, करमाड (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते.

नगररचना विभागाचे माजी संचालक बी. एन. आर. शेंडे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले. यावेळी 'व्रतस्थ' स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. श्रीकारंजेकरबाबा यांनी व्यक्ती आणि तिचे कार्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. मात्र, सध्याच्या काळात गुरूंकडे किती संपत्ती आहे, यावरून शिष्य मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत श्रीमाहुरकरबाबा
शास्त्री यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून धर्म जोपासल्याचे त्यांनी नमूद केले. श्रीविद्वांसबाबा शास्त्री यांनीही यावेळी आपले ज्ञान पंथासमोर मांडले. प्रास्ताविक अनंतराव गजभिये यांनी केले, तर चक्रपाणी कवीश्वर यांनी

आभार मानले.

श्रीमाहूरकरबाबांची

रिद्धपूर विद्यापीठाला देणगी

श्रीमाहूरकरबाबा शास्त्री यांनी आपल्या महानुभाव पंथातील संपूर्ण वाटचालीला केवळ वाट करून देण्यात आली आहे. त्या वाटेवर जाण्याचा मी प्रयत्न करीत आहे. माझा हा सत्कार मी माझ्या पूर्वजांना समर्पित करतो, असे नमूद करून त्यांनी सत्काराला नम्रपणे प्रतिसाद दिला. श्रीमाहूरकरबाबा

शास्त्री यांना पासष्टी सोहळ्यानिमित्त भेट मिळालेल्या ६५ हजार रुपयांमध्ये आणखी ६५ हजारांची भर घालत एकूण १ लाख ३० हजार रूपये रिद्धपूर विद्यापीठाला देणगी म्हणून दिल्याची घोषणा केली.
महानुभाव अभ्यासक्रमाची मागणी

विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत (यूजीसी) 'एम. ए. महानुभाव' हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी शिक्षक व प्राध्यापकांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, महात्मा गांधी विश्वविद्यालय, वर्धा आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे हा अभ्यासक्रम सुरू करावा, अशी

 संत कोण्या एका संप्रदायाचे नाही: श्रीबाभूळगावकरबाबा.

श्रीबाभूळगावकरबाबा शास्त्री यांनी वाचन संस्कृती ढासळत असल्याची खंत व्यक्त केली. साधे दहा रुपयांचे पुस्तक घेण्याचीही तयारी लोकांमध्ये राहिलेली नाही, असे ते म्हणाले. संत कोणत्याही एका संप्रदायाचे नसतात, ते सर्वांचे असतात. संत जनांशी, मनाशी आणि परमेश्वराशी संवाद साधतात. त्यामुळे ते मोठी माणसे असतात. माणसाने सुखाच्या मागे धावण्याऐवजी समाधानाच्या नादी लागले पाहिजे. श्रीमाहुरकरबाबांच्या जीवनात हे समाधान दिसून येते, असे त्यांनी सांगितले, 'अधिकरण' म्हणजे संपूर्ण विषयाचे ज्ञान असलेला. या ज्ञानातून पंथाचा उद्धार कसा होईल, याचा विचार व्हायला हवा. श्रीमाहुरकरबाबा अधिकरण असून त्यांना पट्टी ठावू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

0 Response to "महानुभाव ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आचार्य श्रीपुजदेकरबाबा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article