-->
ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक नागनाथजी डोलारे यांचा " राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक नागनाथजी डोलारे यांचा " राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.



नागपूरबे विभागीय विशेष प्रतिनिधी 
            प्रदीप कडबे. 
"साप्ताहिक जनता की आवाज"

टिटवाळा :- शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी , प्रथमेश मंगल कार्यालय टिटवाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .जप जीवाला बहुउद्देशीय संस्था, टिटवाळा आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा - २०२६ व जिल्हास्तरीय कवी संमेलन दिनांक २६-०९-२०२६ रोजी प्रथमेश मंगल कार्यालय, टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
 
वरील राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व जिल्हा राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष नागनाथ डोलारे होते.या कार्यक्रमाच्या विचारमंचावर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि लेखक मा. नागनाथजी डोलारे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, राज्यभरातून आलेले साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या रचनांनी रसिकांची मने जिंकली.संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "ज्येष्ठ साहित्यिक कवी लेखक नागनाथजी डोलारे यांचा " राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article