रावणवाडी पर्यटन क्षेत्रात स्वच्छता अभियान उत्साहात
रविवार, 27 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा :-:रावणवाडी/खापा : जागतिक पर्यटन दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध रावणवाडी निसर्ग पर्यटन केंद्र व अंबामाता मंदिर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत आयोजित या अभियानात मंदिर परिसर व निसर्ग पर्यटन क्षेत्राची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी परिसरातील प्लास्टिक कचरा संकलित करून प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ओला कचरा व सुका कचरा यांची योग्य विल्हेवाट, कचरा वर्गीकरण आणि पर्यटनस्थळ स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत नागरिक व पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या स्वच्छता अभियानास सौ. कविताताई जगदिश उईके, अध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा, श्री विवेक विठ्ठलराव भगत, प्रशासक ग्रामपंचायत रावणवाडी/खापा, श्री यादोरावजी कुथे, अध्यक्ष, अंबामाता देवस्थान मंदिर समिती रावणवाडी, श्री कीर्तीलाल भैय्याजी उईके, अध्यक्ष, तंटामुक्त समिती रावणवाडी, श्री ईश्वरजी मस्के, उपाध्यक्ष, अंबामाता देवस्थान मंदिर समिती रावणवाडी, श्री जगदीशजी उईके, सामाजिक कार्यकर्ते, रावणवाडी यांची उपस्थिती होती.
तसेच सौ. अर्चना भलावी पोलीस पाटील रावणवाडी, श्री शालिकजी लुटे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत रावणवाडी, श्री निलेश श्रीरामे वनरक्षक रावणवाडी, श्री संजय पंधरे, श्री मंथन उईके, श्री धनंजय उईके, श्री अनिल कानतोडे ग्रामपंचायत कर्मचारी , मेघा पूनमचंद फेंडर, भाग्यश्री तेजराम मते, यमु यादोराव कुथे, मालता मोहन वाढवे, ललिता गुरुदेव भलावी, शारदा विजय उईके, शामकला अनिल कानतोडे यांच्यासह गावातील नागरिक व ग्रामसंघातील महिला सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘स्वच्छ पर्यटनस्थळ, सुंदर रावणवाडी’
0 Response to "रावणवाडी पर्यटन क्षेत्रात स्वच्छता अभियान उत्साहात"
एक टिप्पणी भेजें