वाल्मिक मत्स्य संसाधन केंद्रात महिलेला विद्युत करंट राजीव नगर ताडगाव येथील घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नाचिन्ह; महिलेवर दवाखान्यात उपचार सुरू.
शुक्रवार, 11 सितंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जूनी मोरगाव :- तालुक्यातील राजीव नगर, ताडगाव येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रकल्यांतर्गत वाल्मिक मत्स्य संसाधन केंद्र (BRC), अर्जुनी अंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पात एका महिलेला विद्युत करंट लागल्याची घटना दिनांक ८ रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत करंट लागल्यानंतर संबंधित महिलेला उपचारासाठी एका दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर अद्याप खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर घटनेबाबत संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मत्स्य व्यवस्थापक यांची जबाबदारी असल्याचे तिने सांगतले आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच संबंधित अधिकारी या प्रकरणावर बोलण्याचेही टाळत आहेत.
मत्स्य खादय निर्मीती प्रकल्प संस्पचावय निहीती प्रकल.
दरम्यान, २०२४-२०२५ मध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या मत्स्य ससाधन केंद्रात विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने करण्यात आल्या होत्या का? विद्युत जोडणीची तपासणी करण्यात आली होती का? तसेच केंद्रात काम करणान्या महिला व इतर व्यक्तींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
या घटनेची सविस्तर चौकशी करून केंद्रातील विद्युत सुरक्षेची पाहणी करण्यात यावी आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, व पीडित महिलेला भरीव मदत घ्यावी अशी मागणी होत आहे.
0 Response to "वाल्मिक मत्स्य संसाधन केंद्रात महिलेला विद्युत करंट राजीव नगर ताडगाव येथील घटनेने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नाचिन्ह; महिलेवर दवाखान्यात उपचार सुरू."
एक टिप्पणी भेजें