-->
रेतीची चोरटी वाहतूक; विनानंबर ट्रॅक्टरसह ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

रेतीची चोरटी वाहतूक; विनानंबर ट्रॅक्टरसह ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त.


युगांतर बारसागडे साप्ताहिक
 "जनता की आवाज" 

लाखनी :- दि. २३ सप्टेंबर तालुक्यातील भुगाव/मेंढा परिसरातून मुरमाडी कडे विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, साकोली चे पथक उपविभागीय अधिकारी शिवमं विसापूरे यांचे मार्गदर्शनात गस्तीवर असताना ट्रॅक्टर आढळून आल्याने पथकाने ट्रॅक्टरला थांबून विचारणा केली.
 असता चालकाकडे कोणत्याही प्रकारचा मालवाहतुकीच्या परवाना नसल्याने कारवाई करण्यात आली.या कारवाईत विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि त्यातील अंदाजे एक ब्रास रेती असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सोमवार, सोनमाळा गावाच्या फाट्याजवळ करण्यात आली. पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कृष्णकांत गुनीराम कोडापे (२७, रा. भुगाव/मेंढा) हा ट्रॅक्टर चालक असून अमोल बाळकृष्ण नागलवाडे (३२, रा. न्याहारवाणी) हा ट्रॅक्टर मालक आहे. पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना लाल रंगाचा SWARAJ 834 XM विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह आढळून आला.

ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरलेली होती. चालकाकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. रेती वाहतुकीसाठी आवश्यक पास किंवा परवाना नसताना शासनाच्या मालकीच्या रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई लोकेश पांडुरंग कोतवाल 33 वर्ष यांचे फिर्यादीवरून पालांदूर पोलीस स्टेशन येथे चालक व मालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम ३०५ (ई), ४९ तसेच भारतीय न्याय संहिता सह कलम ३(१)/१८१, ५/१८० मो. वा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 विशेष म्हणजे, आरोपींचा यापूर्वीही अप क्र. ११७/२०२६ व १८०/२०२६, कलम ३०५ (ई) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची नोंद घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील रेती तस्करांचे धाबे दनानले असून अशाच प्रकारच्या यापुढेही कारवाया झाल्यास निश्चितच रेती तस्करीवर लगाम लागून शासकीय मालाची चोरी थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

0 Response to "रेतीची चोरटी वाहतूक; विनानंबर ट्रॅक्टरसह ६.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article