पहेला येथे सोना चांदीच्या दुकानावर दरोडा जवळपास १३ लाखांचे चांदीचे दागिने व नगदी ७५ हजार व कागदपत्र घेऊन दरोडेखोर पसार.
शनिवार, 5 सितंबर 2026
Comment
• जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व विशेष फोर्स ची टीम पहेला येथे दाखल.
• अड्याळ येथील ठाणेदार सचिन तायवाडे यांच्याकडे तपासाची सूत्रे.
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे ५ सप्टेंबर 2026 ला रात्री ३ ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी पहेला येथील सोना चांदीच्या दुकानावर धाड टाकून वैष्णवी ज्वेलर्स चे मालक गणेश अरुणराव निनावे यांच्या दुकानातून अंदाजे १.५०० किलो चांदीचे दागिने अंदाजे किंमत ३.२५ लाख रुपये व दुर्गा ज्वेलर्स सावकारी दुकान चे मालक भूषण शामराव निखारे यांच्या दुकानातून ३.५०० किलो चांदीचे दागिने अंदाजे किंमत ८.७५ लाख रुपये, 75 हजार नगदी व कागदपत्र असलेली तिजोरी जवळपास अंदाजे किंमत ९.५० लाख, असा एकूण १२ .७५ लाखाचा माल अज्ञान चोरट्यांनी लुटून पसार झाले .
याबाबत अड्याळ पोलिस यांनी अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अड्याळ येथील पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे करीत आहे. पहेला गावाला जिल्हा पोलीस अधीक्षक नुरून हसन यांनी त्याचप्रमाणे विशेष फोर्स टीमने भेट दिली असून तपासाची सूत्रे गतीने वाढविण्यात आलेली आहेत
0 Response to "पहेला येथे सोना चांदीच्या दुकानावर दरोडा जवळपास १३ लाखांचे चांदीचे दागिने व नगदी ७५ हजार व कागदपत्र घेऊन दरोडेखोर पसार."
एक टिप्पणी भेजें