-->
डॉल्बी. (डी.जे.) बंद करून बेकायदेशीर वाजविणाऱ्यावर कारवाई करा.

डॉल्बी. (डी.जे.) बंद करून बेकायदेशीर वाजविणाऱ्यावर कारवाई करा.


          दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- दि. ०५ सप्टेंबर/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा तसेच पोलीस अधीक्षक नुरुल हसन भंडारा यांना निवेदन देण्यात आले. डॉल्बीविरोधात विवेकी भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट पुणे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा म. अनिसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. डॉल्बी (डी.जे.) याचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बहि-रेपणा येतो, कानाचे पडदे फाटतात, ज्येष्ठ नागरिका 'ना त्रास होतो, शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्रास होतो, वृद्ध बाळंतीण झालेल्या महिलांना वेदना होतात, लहान मुलांचे जीव जाण्याची शक्यता अस ते, आवाजामुळे हार्ट अटॅक येऊन मृत्यू येण्याची शक्यता असते, यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. लेजर लाईट मुळे पशुपक्ष्यांना व मनुष्याला त्रास होते ही अत्यंत वेदनादायी बाब डॉल्बीमुळे घडत आहे. बेकायदेशीर डॉल्बी वाजविणाऱ्यावर कारवाई करावी याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवा बाजी संघर्ष विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, जिल्हा प्रधान सचिव चंद्रशेखर भिवगडे, शाखा

कार्याध्यक्ष नितेश बोरकर यांनी निवेदन दिले.

जिल्हाधिकारी भंडारा यांनी ध्वनी प्रदूषण (विनियमन आणि नियंत्रण) नियम २००० मधील नमूद असलेले ध्वनी मर्यादाचे उल्लंघन न करणारे साऊंड सिस्टम यांना सदरची अधिसूचना लागू होणार नाही. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता नियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल. सदर अधिसूचना दिनांक ४/९/ २०२६ रोजी रात्री २४-०० वाजता ते दिनांक १/११/ २०२६ रोजी रात्री २३. ५९ वाजेपर्यंत राहील असे आदेश जिल्हाधिकारी भंडारा यांनी तत्काळ जारी केले आहे.

0 Response to "डॉल्बी. (डी.जे.) बंद करून बेकायदेशीर वाजविणाऱ्यावर कारवाई करा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article