चाचेर येथे अंगणवाडीत लोकप्रतिनिधी दिवस साजरा.
शुक्रवार, 25 सितंबर 2026
Comment
नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी
प्रदीप बि.कडबे
साप्ताहिक जनता की आवाज
कोदामेंढी :- ग्रा.पं. चाचेर अंतर्गत अंगणवाडी क्र. ४ मध्ये 'लोकप्रतिनिधी दिवस' साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी योगराज घोरपडे होते. यावेळी अंगणवाडी परिसरामध्ये 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेतून आंब्याचे झाड लावण्यात आले. यावेळी शैलेश कोपरकर, सुरेंद्र टेंबरे, वनश्री टेंभरे, डॉ. मेश्राम, अंगणवाडी सेविका बीसणे, नगरे, श्रोते, बावनकुळे, हुमणे तसेच गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "चाचेर येथे अंगणवाडीत लोकप्रतिनिधी दिवस साजरा."
एक टिप्पणी भेजें