धर्मबोध गोविंद प्रभू जयंती निमित्त...
गुरुवार, 24 सितंबर 2026
Comment
परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू .
श्री प्रभूंचे अवतार कार्य कलियुगात ११४२ ते १२२० पर्यंत झाले. श्री प्रभू बाबांनी श्रीक्षेत्र काटसुर तर एकांच्या मते तर श्रीक्षेत्र मातुलग्राम ला अवतार धारण केले. असे लक्षात येते.
अवतार धारण केल्यानंतर एक दोन वर्षात आई-वडील सरले. त्यांच्या मातेचे नाव माता नेमाईसा तर वडिलांचे नाव अनंत नायक होते. खेडे नावे गव्हानला म्हणजेच मातुलग्रामला मामा मावशीकडे त्यांचे बालपण गेले.
श्री प्रभू बाबांच्या आई-वडिलांनी लहानपणी त्यांचे गुंडो असे नाव ठेवले. लहानपणी सगळेच त्यांना गुंडो म्हणत होते. मोठेपणी मात्र गुंडमस्वामी तसेच श्री गुंडम राऊळ या नावाने संबोधित होते. मात्र आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना श्री प्रभू या नावाने संबोधतात. श्री प्रभूचा ध्यास करीत त्यांच्या दर्शनाला निघालेल्या माता साधे च्या तोंडी 'गोविंद वो ! गोविंद वो!'असे नाव आढळते.
गुंडो, विबुधारण्य, राऊळ, श्री गुंडम राऊळ, श्री प्रभू, श्री गोविंद प्रभू, ही नावे श्री प्रभू बाबांचीच आहे.
श्री प्रभू बाबांचे वय ५३ वर्षे असताना आमच्या सर्वज्ञांनी श्री प्रभू बाबा पासून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला.
श्री प्रभू बाबांचा स्वभाव.
श्रीप्रभू आर्य: हे आर्य नागर : श्रीकृष्ण चक्रवती ते नागर. [वि.सु.८०]
आर्य म्हणजे आर्ष किंवा असंस्कृत, लवकर उठणे, उकड बसणे, आकाशाकडे बघत चालणे आणि धावायचे झाले तर दूडु दुडु धावणे, बेंभळ्यासारखे बोलणे, हिसकावून घेणे, सोळा हात मिऱ्या घालून वस्त्र नेसणे, मळवट कुकुम भरणे, मुंगूटावर भांग जवादी, कानात कस्तुरी, पायात वाकी, गळ्यात साखळे, श्री मुंगूटावर तेल वेणी, नाभी पर्यंत दाढी, हात फिरवत राहणे, टाचेवर भवरी देणे असे आमचे श्री प्रभू बाबा होते.
मूर्ती शाम गौर, डावी करंगळी वाकडी अशी आमच्या श्री प्रभू बाबांची श्रीमूर्ती होती.
श्री प्रभू बाबांचे अवतार कार्य लीळा..
रिद्धपूर, देऊळवाडा, अचलपूर व आसपासच्या परिसरात श्री प्रभू बाबांनी अनेक लीळा केल्या. चरित्रे केली. कितीतरी मृतबालक जीवविले. कितीकांची व्याधी, रोग, दुःख दूर केले. मुक्याला वाचा दिली, पांगळ्याला पाय दिले, अंधास डोळे दिले, निर्धनास धन दिले, कोहळी, द्राक्षी, पडवळ अशा वेलींना उपटून पुन्हा लावले. अग्निवात सुचविणे, सूर्याला बोलावणे, रांजण साऺदने, दुरून गाईचे दूध काढणे, तीकोपद्यांची जाया सर्पानिमित्त मृत्यू सुचविणे, महादाईसाचे विष उतरविले. केशव नाईकाच्या विहिरीला पाणी लागणे, दुष्काळ पडला असता पर्जन्य आव्हानुन पृथ्वी ससनाथ केली. गरीब ब्राह्मणाला कन्याच्या विवाहासाठी द्रव्य दिले असे सामान्य जनांचे दुःख दूर केले. सर्वांवर समान दृष्टी हा श्री प्रभूंच्या ठिकाणचा महत्वाचा गुण होता.
श्री प्रभू बाबा प्रत्यक्ष परमेश्वर अवतार होते. श्री प्रभू बाबांचा अवतार म्हणजे आच्छादनीचा परदृश्य अवतार होय. रीद्धपूरला साक्षात परमेश्वर अवतार श्री प्रभू बाबांनी १२० वर्षे वास्तव्य केल्याने तेथील कण कण पवित्र झाल्यामुळे रिद्धपूरला महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाते.
श्री प्रभू बाबा ते प्रत्यक्ष परमेश्वर अवतार असल्यामुळे इतर विद्यार्थी आपल्या डोक्यावरून पेंड्या आणीत असताना श्री भगवंतांची पेऺडी मात्र अंत्राक्षातुन[अंतरिक्ष] यायची. यांच्या माथ्यातून व शरीरातून प्रकाश बाहेर पडायचा.
असे आमचे श्रीप्रभू बाबा होते.
श्री प्रभू बाबांचे वय १०६ वर्ष असताना जीव कल्याणार्थ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरपंथी निघून गेले. त्यानंतर भक्त मंडळी श्री प्रभू बाबांच्या संन्निधानी आली. १४ वर्ष सर्व श्री प्रभू बाबांच्या संन्निधानात होते. शके १२१२ रोजी श्री प्रभू बाबा स्वधामाला गेले तेव्हा श्री प्रभू बाबांचे वय १२० वर्षे होते.
..राहुल दर्यापूरकर..
🙏🏼 दंडवत प्रणाम🙏🏼
0 Response to "धर्मबोध गोविंद प्रभू जयंती निमित्त..."
एक टिप्पणी भेजें