-->
समन्वयाची भाषा स्वागतार्ह; मात्र दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही — भाजयुमो भंडारा जिल्हा.

समन्वयाची भाषा स्वागतार्ह; मात्र दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही — भाजयुमो भंडारा जिल्हा.




      दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- दि. १० सप्टेंबर २०२६ :भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर महायुतीतील मित्रपक्ष शिवसेना तसेच विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

या पत्रकार परिषदेला भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बोपचे, जिल्हा महामंत्री महेंद्र गभने, जिल्हा युवती प्रमुख पेजल भुरे, युवती सहप्रमुख निकिता मेश्राम, शहर अध्यक्ष अक्षय भिवगडे व रोहित नागपुरे यांनी संबोधित केले.

भाजप-शिवसेना समन्वयाचे स्वागत; मात्र दुटप्पी भूमिका चालणार नाही..

शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष अनिल गायधने यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि शिवसेनेने समन्वयाने काम करावे, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र यावे, अशी भूमिका मांडली आहे. विकासाच्या कामांसाठी आणि महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याच्या या भूमिकेचे भारतीय जनता युवा मोर्चा स्वागत करतो.

मात्र, एकीकडे समन्वयाची भाषा करायची आणि दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर टीका, आरोप अथवा दमदाटीची भाषा करायची, ही भूमिका स्वीकारली जाणार नाही. एकीकडे समन्वय आणि दुसरीकडे संघर्ष, अशी दुहेरी भूमिका अधिक काळ चालू शकत नाही.

समन्वयाची भाषा करण्यापूर्वी आत्मपरीक्षण आवश्यक.

महायुती सरकारच्या माध्यमातून मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. एकनाथजी शिंदे आणि मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जिल्ह्यात अनेक विकासकामे पूर्ण झाली असून अनेक कामे सुरू आहेत.

या विकासकामांसाठी महायुतीतील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे. मात्र, विकासकामांचा विषय आला की एकत्र येणे आणि राजकीय श्रेयाचा प्रश्न निर्माण झाला की वेगळी भूमिका घेणे, हे योग्य नाही.

महायुती ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित व्यवस्था नसून जनतेच्या हितासाठी आणि विकासासाठीची जबाबदारी आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर खालच्या पातळीवरील टीका सहन करणार नाही.

भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेसाठी प्रामाणिकपणे काम करतो. उन्हात-पावसात गावागावात, बूथपातळीवर जाऊन पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांवर सोशल मीडिया किंवा सार्वजनिक मंचावरून खालच्या पातळीवर टीका केली जात असेल, तर भाजयुमो गप्प बसणार नाही.

राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र भूमिका असू शकते. मात्र, राजकीय मतभेद व्यक्त करताना राजकीय संस्कार, सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक आहे.

विचारांना विचारांनी उत्तर द्या, विकासाला विकासाने उत्तर द्या; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्याची भाषा स्वीकारली जाणार नाही.

समोर समन्वय आणि मागून टीका, हे चालणार नाही.

भाजप आणि शिवसेनेमध्ये खरोखरच समन्वय हवा असेल, तर तो प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. समोरासमोर चर्चा करून गैरसमज दूर करणे, विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येणे आणि महायुती मजबूत करणे, हीच योग्य दिशा आहे.

मात्र, समोर समन्वयाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून भाजपविरोधी वातावरण निर्माण करायचे, हे योग्य नाही.

समन्वय हवा असेल तर तो मनापासून आणि प्रत्यक्ष कृतीतून हवा; केवळ पत्रकार परिषदेत बोलून चालणार नाही.

भाजपचा संयम ही कमजोरी नाही

भारतीय जनता पक्ष हा शिस्त, संस्कार आणि संयम मानणारा पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक वक्तव्याला तत्काळ प्रतिक्रिया देणे ही भाजपची संस्कृती नाही. मात्र, आमच्या संयमाचा गैरफायदा कोणीही घेऊ नये.

भाजपचे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांवर विनाकारण आरोप, अपमानास्पद भाषा किंवा धमकीवजा वक्तव्ये केली गेली, तर भाजयुमो त्याला योग्य, ठाम आणि लोकशाही मार्गाने उत्तर देईल.

आम्हाला कोणाशीही विनाकारण संघर्ष करायचा नाही. आमचे प्राधान्य विकास, जनतेची कामे आणि महायुती मजबूत करणे हेच आहे.

श्रेयासाठी नव्हे, विकासासाठी एकत्र या!..

आज जनतेला राजकीय भांडणे नको आहेत. जनतेला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सर्वांगीण विकास हवा आहे.

त्यामुळे एखाद्या विकासकामाचे श्रेय कोणाला मिळेल, यापेक्षा ते काम जनतेसाठी किती उपयुक्त आहे, याला महत्त्व दिले पाहिजे.

महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन विकासकामांना गती देणे, हीच आजची गरज आहे.

भाजयुमोचा स्पष्ट संदेश..

अनिल गायधने यांनी मांडलेल्या समन्वयाच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. मात्र हा समन्वय दुहेरी मापदंडांचा नसावा.

भाजपला अंगावर घेऊन नंतर समन्वयाची भाषा करणे योग्य नाही. भाजपचा कार्यकर्ता शांत आहे, संयमी आहे; पण कमजोर नाही.

आम्हाला संघर्ष नको, आम्हाला विकास हवा आहे.
आम्हाला वैयक्तिक राजकारण नको, आम्हाला जनतेच्या प्रश्नांवर काम करायचे आहे.

महायुती मजबूत ठेवायची असेल तर सर्वांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, युतीधर्म पाळला पाहिजे आणि विकासाच्या कामात एकत्र आले पाहिजे.

भाजप आणि भाजयुमो नेहमी विकासाच्या बाजूने ठामपणे उभे राहतील. मात्र भाजपच्या नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर विनाकारण चिखलफेक झाली, तर त्याला योग्य, ठाम आणि लोकशाही मार्गाने उत्तर दिले जाईल.

 भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा जिल्हा

0 Response to "समन्वयाची भाषा स्वागतार्ह; मात्र दुटप्पी भूमिका खपवून घेतली जाणार नाही — भाजयुमो भंडारा जिल्हा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article