आधार तू जीवनी..(काव्य फूले )
गुरुवार, 10 सितंबर 2026
Comment
संकलन :- प्रदीप बि.कडबे
दडले होते स्वप्न माझे
बा भीमा आधार तू जीवनी
अंधारा कोठडीतून मला
फूलविले तू आज दिशा देऊनी---१--
निराधारांचा तू बाप झाला
जगण्याचा तुझ्यामुळे मार्ग
सार्थक झाले जीवन आमचे
तू दाखविला निळा स्वर्ग--२--
आकाशी घेतली झेप बाबा
धम्म बुद्धाचा घेऊन जिंकले
सम्यक-समृद्धीमुळे आज
तू दिलेला धम्मपथावर चालले--३--
प्रज्ञाशील आणि करुणेची
मनामनात बिजे रुजवली
आधार तेव्हा तुझाच होता
त्यामुळे आमची प्रगती झाली--४--
तुझ्या संस्कारामुळे आम्ही
आज सर्व शिक्षित झालो
करुनी पंचशीलाचे पालन
बाबा, प्रज्ञाच्या रांगेत न्हालो---५--
शुभा थुलकर रामटेक
जिल्हा नागपूर
0 Response to "आधार तू जीवनी..(काव्य फूले )"
एक टिप्पणी भेजें