-->
शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड देत उत्पन्नवाढीचा मार्ग स्वीकारावा..

शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड देत उत्पन्नवाढीचा मार्ग स्वीकारावा..



• आमदार राजुभाऊ कारेमोरे, मोहाडी - तुमसर विधानसभा क्षेत्र.

           कुलदिप गंधे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

  भंडारा :- शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांचा स्वीकार करून आपल्या उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करावेत. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून मत्स्य व्यवसायाला शेतीची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा आणि सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते प्रमुख उपस्थित म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन तहसील सभागृह, मोहाडी येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

शेतकऱ्यांना शेतीसोबत मत्स्यपालनाचा व्यवसाय कसा विकसित करता येईल, याबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. मत्स्यपालनासाठी तलावाची निवड व व्यवस्थापन, मत्स्यबीजाची निवड, मत्स्यबीज संचयन, खाद्य व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, मत्स्यरोगांचे व्यवस्थापन, आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान तसेच खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजना व अनुदान याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कृषीपूरक व्यवसाय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेती, पशुपालन, मत्स्यपालन यांसारख्या विविध व्यवसायांचा समन्वय साधून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याबरोबरच उपलब्ध जलस्रोतांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग करण्याची दिशा मिळाली. कृषीपूरक व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा,भंडारा कार्यालयामार्फत जिल्ह्यात साकोली व मोहाडी येथे सदर विषयावरील प्रशीक्षण आयोजित करण्यात आले.
साकोली येथील प्रशिक्षणात ७५ शेतकरी तर मोहाडी येथिल प्रशीक्षणात ८० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

प्रशिक्षणाला आशा बोन्द्रे उपसभापती पंचायत समिती, मोहाडी यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

प्रशिक्षणाचे सविस्तर नियोजन आणि समन्वयासाठी प्रकल्प संचालक आत्मा, उर्मिला चिखले आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग भंडारा यांचे नियोजनातून तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपेक्षा बोरकर, सतिश वैरागडे, शेखर खंडाईत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा भंडारा यांनी परिश्रम घेतले.

सदर प्रशीक्षणाला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्रवण रणदिवे पदवीधर मत्स्य तज्ज्ञ यांनी सादरीकरनाद्वारे उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाला तालुका भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील ८० मत्स्यपालक शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणाला मत्स्य विभाग अंतर्गत दुर्गेश केंडे आणि कृषी अधिकारी मोरेश्वर डोंगरवार आणि अधिनस्त कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमास कृषि विभाग, अधिकारी-कर्मचारी, प्रशिक्षणार्थी शेतकरी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर जिल्हानंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अपेक्षा बोरकर यांनी तर प्रस्तावित प्रकल्प संचालक आत्मा,भंडारा उर्मिला चिखले यांनी केले.

0 Response to "शेतीला मत्स्य व्यवसायाची जोड देत उत्पन्नवाढीचा मार्ग स्वीकारावा.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article