पहेला/सोनेगावच्या तरुणांनी स्वखर्चातून उभारली आदर्श अभ्यासिका.
मंगलवार, 1 सितंबर 2026
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पहेला :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शांत, अभ्यासासाठी योग्य आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने पहेला (सोनेगाव) येथील तरुणांनी एकत्र येत कोणत्याही शासकीय अथवा इतर आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खर्चातून अभ्यासिका उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमामुळे गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकणार आहेत. तरुणांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे गावकऱ्यांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गावाच्या विकासात युवकांनी पुढाकार घेतल्यास अनेक सकारात्मक बदल घडू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या अभ्यासिकेच्या उभारणीत खालील तरुणांचा मोलाचा सहभाग आहे:
अभिषेक भांडे, राकेश शहारे, अमन चौधरी, रोहित हिवरकर, तन्मय शहारे, पीयूष पेंदे, कुणाल पाल, अनिकेत देशमुख, धीरज वैद्य, आदर्श हिवरकर, मानव पेंदे, गौरव देशमुख, सुधांशु मेश्राम, अथर्व वैद्य आणि साहिल भांडे.
या तरुणांनी केलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा असून शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अभ्यासिकेची जपणूक करण्याचे आणि विद्यार्थ्यांनी तिचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
0 Response to "पहेला/सोनेगावच्या तरुणांनी स्वखर्चातून उभारली आदर्श अभ्यासिका."
एक टिप्पणी भेजें