-->
सेंट रोबेनच्या तनुश्री शेंडेला राज्य पुरस्कार.

सेंट रोबेनच्या तनुश्री शेंडेला राज्य पुरस्कार.



       प्रदीप कडबे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नागपूर :- जरीपटका येथील मिसाळ लेआऊटमधील सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीत शिकणाऱ्या तनुश्री नितीन शेंडे हिने स्काउट-गाइडचे राज्यस्तरीय पदक व पुरस्कार प्राप्त केला. शाळेचे संचालक जोतिराव बारसागडे यांनी तनुश्रीचा सत्कार केला. स्काउट-गाइडचे शिक्षण लॉर्ड बेडन पॉवेल आणि मिसेस बेडन पॉवेल यांनी सुरू करून जगभरात आदर्श, शिस्तप्रिय, आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि सेवाभावी नागरिक घडविण्यात योगदान दिले, असे मत तनुश्रीने व्यक्त केले. संचालन ब्रिजेश कापसे यांनी केले, तर आभार शिक्षिका शेख यांनी मानले. यावेळी स्वप्नील कठाणे, मुख्याध्यापिका धनश्री बारसागडे, नेहा बोदेले आणि कोमल बाहेकार उपस्थित होते.

0 Response to "सेंट रोबेनच्या तनुश्री शेंडेला राज्य पुरस्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article