अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्म व्यक्तींनी येणाऱ्या जनगणनेत धर्म बौद्ध व पूर्वाश्रमीची जात महार लिहावी :- सेवानिवृत्त आईएएस. अधिकारी श्याम तागडे.
सोमवार, 7 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- सन 2027 च्या जनगणना कार्यक्रम केंद्र शासनाने घोषित केलेला आहे व सर्व राज्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे जनगणनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाविषयी जी माहिती गोळा केली जाते. ती माहिती अधिकृत समजून त्या माहितीच्या आकडेवारीनुसार देशाचे राज्याचे जिल्ह्याचे शहराचे व गावचे धोरण ठरविले जात असून नियोजन आराखडे तयार केले जातात.
विकासाच्या योजना सुद्धा या आकडेवारीच्या आधारे तयार केल्या जातात या जनगणनेच्या आकडेवारीवरून देशातील राज्यातील जिल्ह्यातील शहरातील व गावातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त भटक्या जमाती व इतर सर्व जातीची लोकसंख्या निश्चित होते. याच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या संसद व विधान मंडळातील राखीव जागा विधानसभा जिल्हा पंचायत महानगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत मधील राखीव जागांची संख्या निश्चित केली जाते.
व त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील अनुसूचित जाती व इतर जातीच्या आरक्षणाची टक्केवारी देश पातळीवर आरक्षणाची टक्केवारी जनगणनेतील लोकसंख्या च्या टक्केवारी निश्चित होते त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध व अनुसूचित जातीतील लोकांनी धर्म बौद्ध व जात महार लिहिणे अत्यंत आवश्यक आहे असे मत भंडारा येथील इंद्रलोक सभागृहामध्ये जनगणना 2027 संविधानिक आरक्षण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या संबंधाने राज्यव्यापी अभिमान व
प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्याम तागडे यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रज्ञा प्रतिष्ठानचे जिल्ह्यातील अध्यक्ष विनोद रामटेके, तालुक्यातील माणिक रामटेके, डॉ रत्नदीप गेडाम, डॉ अनुदवाज रंगारी ,अशोक हुमणे , जगजीवन सुखदेवे ,
इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी यांनी सांगितले की अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या बौद्ध समुदायाच्या नागरिकांमध्ये धर्म व जात यांची जनगणना नोंद करण्याविषयी संभ्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व आपल्या पाच लाख अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या वेळी फक्त हिंदू आणि धर्मातील मूळच्या अस्पृश्य व्यक्तींना अनुचित जातीच्या दर्जा कायद्यानुसार मान्य होता व ते अनुसूचित जाती म्हणून स्वतःची नोंद करू शकत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेनंतर त्यांच्या या अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला व धर्म म्हणून बौद्ध अशी नोंद केली ते अनुसूचित जातीचा दर्जा मिळवण्यासाठी पात्र नव्हते असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद रामटेके यांनी केले तर संचालन डॉ श्वेता वासनिक मॅडम यांनी या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर अनुद्वाज रंगारी, रोशन जांभुळकर,राजेश मडामे , पराग गणवीर ,राकेश रामटेके हेमंत गजभिये रत्नाकर सुखदेव यांनी कार्यक्रम करण्यासाठी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते अमृत बनसोड,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते युवराज खोब्रागडे, महादेव मेश्राम, ग्यानचंद जांभुळकर, परीका रामटेके, राजेश मडामे ,अशोक रंगारी, कागदराव रंगारी, विलास मेश्राम, युवराज खोब्रागडे,भरपूर सामाजिक क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभागृह मध्ये बसण्यासाठी जागा नव्हती सभागृहाच्या बाहेरून लोक ऐकत होते अतिशय उत्तम कार्यक्रम सभागृहात घडविण्यात आला त्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजकांचे आभार मानले
0 Response to "अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्म व्यक्तींनी येणाऱ्या जनगणनेत धर्म बौद्ध व पूर्वाश्रमीची जात महार लिहावी :- सेवानिवृत्त आईएएस. अधिकारी श्याम तागडे. "
एक टिप्पणी भेजें