-->
राधिका (भारती ) तितीरमारे यांना राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार प्रदान.

राधिका (भारती ) तितीरमारे यांना राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार प्रदान.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मोहाडी तालुक्यातील बोथली येथील कवयित्री राधिका(भारती ) कैलास तितीरमारे यांना "राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार - २०२६" ने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रबोधिनी प्रेरणा फाउंडेशन वर्धा व प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाची, काव्यप्रतिभेची व सृजनशील लेखनाची दखल घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या लेखणीतून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि मायबोलीचा मूल्यांचा गौरव होत असून त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार संस्थेच्या वतीने काढण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा 
दि. ६ सप्टेंबर रोजी वर्धा येथे पार पडला.
या पुरस्कारामुळे त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Response to "राधिका (भारती ) तितीरमारे यांना राज्यस्तरीय प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार प्रदान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article