तुमसर रुग्णालयाकडून कंत्राटदाराला नोटीस.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
सुनील जयस्वाल
साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- दि. २३ सप्टेंबर : स्थानिक सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे उपचार घेत असलेल्या गर्भवती महिला रुग्णाच्या जेवणात अळी आढळल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाने संबंधित आहार पुरवठादार संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, चौकशीअंती करारातील अटींनुसार कडक प्रशासकीय व आर्थिक कारवाईसह करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय यंत्रणा वेगाने हलली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा उपस्थित होते.
शल्य चिकित्सक डॉ. निखिल डोकरीमारे यांनी सोमवारी स्वतः तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील स्वयंपाकगृहाला (किचन) भेट देऊन सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बाळबुद्धे, कार्यालयीन अधीक्षक अमित चौधरी यांच्यासह रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी
उपजिल्हा रुग्णालयात आहार पुरवठा करण्याचे कंत्राट पालघर येथील 'मेसर्स राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था' या पुरवठादाराकडे आहे. रुग्णांना स्वच्छ, पौष्टिक व सुरक्षित अन्न पुरवणे ही संबंधित संस्थेची प्राथमिक जबाबदारी असताना, या प्रकारामुळे संस्थेचा
"गरोदर महिलांच्या अन्नात अळ्या आढळणे ही अत्यंत संतापजनक बाब असून रुग्णांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने केवळ नोटीस न देता त्या बेजबाबदार कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून कठोर कारवाई करावी."
अमित मेश्राम,
अध्यक्ष
स्वराज्य युवा ए. फाउ.तुमसर
निष्काळजीपणा स्पष्टपणे समोर आला आहे.
वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पुरवठादाराबाबत यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या व त्यांना सुधारणेची ताकीद देण्यात आली होती. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन भंडारा विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी पूनम तूरकर व पूजा बोरकर यांनी रुग्णालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांचे बयान नोंदवले असून स्वयंपाकगृहाची सखोल चौकशी केली आहे. एफडीएचा अधिकृत तपासणी अहवाल प्राप्त होताच संबंधित
संस्थेवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल.
रविशेषतः गर्भवती महिला, प्रसुती माता, बालके व गंभीर रुग्णांच्या आहारात कसलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरवठादाराची राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा अन्नाचा पुरवठा टाळण्यासाठी भाजीपाला, कच्चा माल, स्वयंपाकगृहाची स्वच्छता आणि तयार अन्नाची गुणवत्ता तपासण्याचे कडक निर्देश ठेकेदाराला देण्यात आले आहेत.
0 Response to "तुमसर रुग्णालयाकडून कंत्राटदाराला नोटीस."
एक टिप्पणी भेजें