-->
यूएसपींचे आवाहन; साकोलीत शांतता समितीची बैठक.

यूएसपींचे आवाहन; साकोलीत शांतता समितीची बैठक.


• सण-उत्सव शांततेत साजरे करा.

           युगांतर बारसागडे
 "साप्ताहिक जनता की आवाज"
 
 साकोली, (ता. प्र.) :- सण-उत्सवांमध्ये जातीय सलोखा राखून एकमेकांच्या उत्सवात सहभागी व्हावे, तसेच सणोत्सव शांततेत साजरे करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी केले. आगामी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, नवरात्र दुर्गोत्सव, शारदोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी या विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाच्या वतीने शांतता समितीची बैठक एम. बी. पटेल कॉलेज येथे पार

पडली. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष देवश्री कापगते, जिल्हा शांतता समितीचे सदस्य डी. जी. रंगारी, शब्बीर पठाण, भावेश कोटांगले, पाथरीच्या सरपंच पूजा देशमुख, पालांदूरचे प्रा. युवराज खोब्रागडे आदींनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक पोलिस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांनी केले. आभार लाखनीचे पोनि गजभिये यांनी मानले.

0 Response to "यूएसपींचे आवाहन; साकोलीत शांतता समितीची बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article