फरार सरपंच यांना अटक करा या मागणीसाठी वंचितच्या शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- 11 सप्टेंबरला 26 खैरी येथील दिलीप सदाशिव कांबळे यांची नाली साफ करा यावरून दिलीप सदाशिव कांबळे व सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्यात वाद झाला तो वाद विकोपाला गेला त्यामध्ये खूप मारहाण झाली.
त्याच्यात दिलीप कांबळे त्यांना साकोली भंडारा नागपूर रुग्णालयात हलवण्यात आले त्यात मृत्युमुखी पडले मृत्यूची बातमी मिळतात आरोपी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे फरारा असून अजून पर्यंत तो सापडला नाही.म्हणून वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी ,तालुक्याचे अध्यक्ष जगदीश रंगारी सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, वंचित चे वैभव मोटघरे ,प्रशिक मोरघरे , राहुल तागडे , केवलराम उके व अन्य कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन डीवायएसपी व ठाणेदार यांची भेट घेऊन त्यांना तात्काळ अटक करा.
सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, तपासणी करा, केस मध्ये कोणत्या प्रकारचे होणार नाही याची दक्षता घ्या व आरोपी वाचेल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणार नाही व पुरावे नष्ट होणार याची दक्षता घ्या!..या सर्व मागणीला धरून भेट व चर्चा शिष्टमंडळ डी.वाय.एस.पी.ठाणेदार यांनी सांगितले की, "आम्ही कोणत्या फायदे करणार नाही काय करणार नाही कायदा आपला काम करेल". जेव्हा मृत्यूची बातमी मिळाली तेव्हापासून आम्ही सतत प्रयत्नशील आहोत."आमचे सर्व पोलीस विभागाचे कर्मचारी फिरत असून आरोपीला लवकर अटक करण्यात येईल व पिढीतला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील".
असे मत पोलीस विभागीय अधिकारी शिवम विसापुरे व थानेदार महादेव आचरेकर यांनी शिष्टमंडळात सांगितलं.
0 Response to "फरार सरपंच यांना अटक करा या मागणीसाठी वंचितच्या शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला."
एक टिप्पणी भेजें