-->
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!.

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!.


• राजकीय पुढारी व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून जीवितास धोका.

   "साप्ताहिक जनता की आवाज"
          वृत्तपत्र प्रतिनिधी 

 भंडारा :- निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशजी कचकलवार यांच्या जीवितास काही राजकीय पुढारी तसेच त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून धोका असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करून तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करण्यात येत आहे.

पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडताना पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अनेकदा दबाव, धमक्या आणि विरोधाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होण्यापूर्वीच शासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी संघटनेची मागणी

आहे.

या मागणीसाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देण्याचे सत्र सुरू असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच श्री गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.

"धोका निर्माण होण्याची वाट पाहू नका!"" एखादी गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुरक्षेबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा," अशी भूमिका निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने घेतली आहे. महाराष्ट्रातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी-सदस्य यांनी या मागणीला पाठिंबा देत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

एकच मागणी - संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशजी कचकलवार यांना सुरक्षा द्या, पत्रकारांचा आवाज सुरक्षित ठेवा! श्री गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षा देण्यात यावी ही मागणी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.

0 Response to "निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article