-->
केंद्रीय कर्मचाऱयांना मिळणार मोठा दिलासा?..

केंद्रीय कर्मचाऱयांना मिळणार मोठा दिलासा?..


DA मध्ये ३% वाढीची शक्यता, पगारात होणार वाढ..

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :- केंद्रीय सरकारी - कर्मचारी आणि पेन्शनधार कांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता असून, यावेळी ३ - टक्क्यांची वाढ होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे. = केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा सुधारणा केली जाते.

जानेवारी आणि जुलै या दोन - टप्प्यांमध्ये DA मध्ये बदल केला जातो. महागाईचा परिणाम लक्षात - घेऊन या वाढीसाठी ऑल इंडिया कन्झ्युमर इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल निर्देशांकातील सहा महिन्यांच्या - आकडेवारीचा आधार घेतला जातो.

- वर्कर्स (AICPI-IW) या DA ६३ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता

 जानेवारी २०२६ मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी

K010583 रिजर्व बैंक ₹५०० पचि आणि पेन्शनधारकांचा DA/DR ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला. आता जुलैच्या सुधारणा चक्रात आणखी ३ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ प्रत्यक्षात लागू झाल्यास DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात तसेच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ होईल.

मात्र, ३ टक्के वाढीबाबत सध्या केवळ अंदाज व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारकडून अधिकृत निर्णय झाल्यानंतरच वाढीचे प्रमाण निश्चित होईल.

 दसरा-दिवाळीच्या काळात घोषणा होणार ?

महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा साधारणपणे वर्षातील सणासुदीच्या काळात केली जाते. त्यामुळे यंदाही ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून DA वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा दिवाळी ८ नोव्हेंबर २०२६ रोजी असल्याने त्याआधी DA वाढीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमकी तारीख आणि वाढीचे अंतिम प्रमाण केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.

पगारात किती वाढ होणार?..

DA मध्ये ३ टक्क्यांची वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार प्रत्यक्ष मिळणाऱ्या रकमेत फरक पडेल.

त्यामुळे ज्यांचे बेसिक पे जास्त आहे, त्यांना वाढीचा लाभही तुलनेने अधिक मिळेल. उदाहरणार्थ, *५०,००० रुपयांच्या बेसिक पगारावर ३% DA वाढ म्हणजे महिन्याला १,५०० रुपये अतिरिक्त मिळू शकतात.

0 Response to "केंद्रीय कर्मचाऱयांना मिळणार मोठा दिलासा?.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article