-->
कलेक्टर ते तहसीलदार सर्वांना दुपारी नागरिकांसाठी वेळ राखीव ठेवणे बंधनकारक!.

कलेक्टर ते तहसीलदार सर्वांना दुपारी नागरिकांसाठी वेळ राखीव ठेवणे बंधनकारक!.




उमेश बोरकर.
साप्ताहिक"जनता की आवाज"


भंडारा :- महसूल विभागाच्या कार्यालयांत अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाने दुपारी ३ ते ५ हा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना प्रत्येक कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ हा दोन तासांचा वेळ नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्यपणे राखीव ठेवावा लागणार आहे.
कारण नागरिक तक्रारी घेऊन कार्यालयात गेले असता अधिकारी/कर्मचारी उपस्थित नसल्याच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या. यामुळे लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.अधिकारी गैरहजर असल्यास काय? अत्यंत तातडीचे शासकीय काम, दौरा किंवा उच्चस्तरीय बैठक असल्यास त्याची पूर्वकल्पना फलकावर प्रसिद्ध करावी लागणार. 

नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार.या राखीव दुपारी ३ ते ५ वेळेत कोणतीही अंतर्गत बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करता येणार नाही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर व अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ही वेळ दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक अभ्यागतांच्या भेटी व तक्रारींची नोंद ठेवण्यासठी मध्यवर्ती नोंदवही ठेवावी लागणार.
हा शासन निर्णय ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला असून, महसूल विभागाच्या संबंधित सर्व कार्यालयांत लागू होणार आहे. छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी नागरिकांना मंत्रालयापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये, हा या मागील प्रमुख उद्देश आहे.

0 Response to "कलेक्टर ते तहसीलदार सर्वांना दुपारी नागरिकांसाठी वेळ राखीव ठेवणे बंधनकारक!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article