-->
रोजगार सहायकाविना 'विकसितग्रामपंचायत योजना समिती'व्हिबीजी रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबद संभ्रम..

रोजगार सहायकाविना 'विकसितग्रामपंचायत योजना समिती'व्हिबीजी रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबद संभ्रम..

• जी राम जी 125 दिवस विकसित भारत ग्रामीण रोजगार की नयी गारंटी.

         युगांतर बारसागडे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली/लाखनी :- केंद्र शासनाच्या विकसित भारत-जी राम जी योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 'विकसित ग्रामपंचायत योजना समिती' स्थापन करण्याचे आदेश गटविकास अधिकारी संदिप पानतावणे यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र सर्व ग्रामपंचायतींना निर्गमित करण्यात आले आहे

पण या समितीतून रोजगार सहायकालाच डावलले असल्याने नियोजनाबाबद संभ्रम निर्माण होण्याचे मार्गावर आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक गावाचा पुढील ५ वर्षाचा एकात्मिक विकास आ राखडा (व्हिजिपिपी) तयार केला जाणार आहे. हा आराखडा ४ मुख्य संवर्गात तयार होणार असून १) जलसुरक्षा, २) ग्रामीण पायाभूत सुविधा, ३) उपजीी 'क्का संसाधने, ४) आपत्ती व्यवस्थापन यावर भर दिला जाणार आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ३१८ कामांपैकी गावाच्या गरजेनुसार आणि भौगोलिक पर्पा रस्थितीनुसार कामांची निवड केली जाणार आहे.

या समितीचे अध्यक्ष सरपंच असतील, तर ग्रामसेवक सदस्य सचिव असतील. उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील डॉक्टर, शिक्षक, महिला मंडळ, युवक मंडळ, वकील, पर्यावरण तज्ञ, ज्येष्ठ नागरिक (कमीत कमी २५ प्रख्यात व्यक्ती) तसेच कृषी, वन, बांधकाम, जलसंधारण विभागाचे अधिकारी सदस्य असतील व तांत्रिक सहाय्यक हे नोडल ऑफिसर राहणार असून त्यांना भौगोलिक परिस्थितीनुसार कामे निवडायची आहेत.

मुख्य चालकालाच डावलले

धक्कादायक बाब म्हणजे जो या योजनेचा मुख्य चालक आहे, गाव पातळीवर रोजगाराची मागणी, जॉबकार्ड, मस्टर, युक्तधारा अपलोडिंग पर्यंत सर्व कामे

पाहणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकालाच या समितीतून डावलण्यात आले आहे. त्यामुळे ५ वर्षाचा विकास आराखडा सहाय्यकाच्या अनुपस्थितीत कसा तयार होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार सहाय्यकांशिवाय आ-राखडा अपूर्ण राहील, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. आराखडा ६० टक्के मजुरी व ४० टक्के साहित्य या प्रमाणातच असणे बंधनकारक राहील, आराखडा तयार झाल्यावर सर्व कामे 'युक्तधारा' प्रणालीवर अपलोड करावी लागणार, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक यांची नोडल अधिका-री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शिवार फेरी करून कामांचे अंदाज-पत्रक तयार करायचे आहे. पुढील ५ वर्षात रोजगाराच्या मागणीनुसार आणि गा-वाच्या विकासाच्या उद्देशाने सर्व प्रकारची कामे आराखड्यात घ्यावीत, जेणेकरून लोकप्रतिनिधी किंवा लाभार्थ्यांची कामे घेण्याबाबत कोणतीही तक्रार येणार नाह-, याची दक्षता घ्यावी, तालुका यंत्रणा प्रमुखांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना ग्राम-पंचायतीमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हा आराखडा १०० टक्के अचूक आणि व्य-वस्थित तयार करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी यांनी दिले आहेत. हा आ-राखडा थेमॅटिक लेअर चा वापर करून तयार करण्यात येणार आहे. या आदेशाम-ळे आता प्रत्येक गावाचा ५ वर्षाचा विकासाचा रोडमॅप तयार होणार असून, ग्रामीण भागातील रोजगार आणि विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

0 Response to "रोजगार सहायकाविना 'विकसितग्रामपंचायत योजना समिती'व्हिबीजी रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबद संभ्रम.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article