शालेय बसचालकांना राखी बांधून व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव.
बुधवार, 2 सितंबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी/मोरगाव :- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयातील गाईडच्या विद्यार्थिनींनी एक आगळावेगळा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. विद्यार्थिनींनी शाळेतील बसचालकांना राखी बांधून त्यांच्या सुरक्षित आणि जबाबदार सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली.
शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सुरक्षितपणे शाळेत,
आणणे-नेणे,वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि विद्यार्थ्यांची काळजी घेणे, ही बसचालकांची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यांच्या या सेवेला सन्मान देण्यासाठी विद्यार्थिनींनी बसचालकांच्या कृतज्ञता आणि सुरक्षिततेच्या भावनेचे प्रतीक आहे' असा संदेश विद्यार्थिनींनी दिला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात शाळेच्या उपप्राचार्या अर्चना गुरुनुले, दिपाली गोल्लीवार, दिपेश्वरी मेंढे, किरण पर्वते उपस्थित होत्या.
0 Response to "शालेय बसचालकांना राखी बांधून व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव."
एक टिप्पणी भेजें