-->
जयंत बडवाईक यांची समाजसेवा व गरजूंना मदतीचा हात हे एक आदर्श.

जयंत बडवाईक यांची समाजसेवा व गरजूंना मदतीचा हात हे एक आदर्श.



          संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- सामाजिक बांधिलकी केवळ शब्दात न ठेवता प्रत्यक्षात कृतीतून समाजाच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणारे जयंत कृष्णराव बडवाईक यांच्या विविध सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. पारंपारिक बैलपोळा व त्यांना पोळ्याच्या उत्साह वाढविण्यापासून ते गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांचे सामाजिक कार्य व्यापक होत आहे.

आपत्कालीन परिस्थितीत एखादा गरजू रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये यासाठी जयंत बडवाईक यांच्याकडून मोफत ऑक्सिजन गॅस सिलेंडरची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे .संकटाच्या काळात गरीब कुटुंबाला तातडीने मदत मिळावी हा या उपक्रमा मागील उद्देश आहे.

याच सामाजिक कार्याला आणखी एक महत्त्वाची जोड येत्या 15 दिवसात साकोली तालुक्यासाठी मोफत शव पेटी उपलब्ध करून देण्याचा संकल्प जयंत बडवाईक यांनी केला आहे. बाहेरगावी असलेले नातेवाईक येईपर्यंत मृत शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक कुटुंबांना शीतपेटीची आवश्यकता भासते अशा दुःखद प्रसंगी सर्वसामान्य कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी सुविधा उपलब्ध सुविधा मोफत देण्यात येणार आहे. दरम्यान बैलपोळा व ताना पोळ्यानिमित्त सावरबंद, बोंडे, वळद , कुंभली आणि धर्मापुरी या पाच गावांमध्ये बैलजोडी सजावट तसेच तानापोळ्यातील वेशभूषा सजावटीसाठी बक्षीस देत बडवाईक यांनी शेतकरी बांधव आणि बालगोपालांच्या उत्साह वाढविला. परंपरा जपण्यास गरजू रुग्णांना आरोग्य विषयक मदत आणि दुःखांच्या प्रसंगी कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न अशा विविध माध्यमातून जयंत बडवाईक यांची सामाजिक बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित होत आहे.

प्रसिद्ध पेक्षा समाजासाठी काहीतरी उपयोगी करता आले हेच माझ्यासाठी मोठे समाधान आहे असे मत त्यांनी प्रतिनिधीला बोलताना व्यक्त केले. गरजेच्या वेळी एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली तर त्यासाठी माझे सामाजिक समाधान दुसरे नाही अशी भावना जयंत कृष्णराव बडवाईक यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिक शेतकरी बांधव आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत असून सामाजिक कार्य म्हणजे केवळ बोलले नव्हे तर गरजेच्या वेळी माणसाच्या मदतीला धावून जाणे हा आदर्श त्यांच्या कार्यातून पुढे येत आहे.

0 Response to "जयंत बडवाईक यांची समाजसेवा व गरजूंना मदतीचा हात हे एक आदर्श. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article