व्हिओएम' तर्फे अपघातग्रस्त दिव्यांग पत्रकारास अर्थसहाय्य.
बुधवार, 16 सितंबर 2026
Comment
'
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
लाखनी :- तालुक्यातील साप्ताहिक"जनता की आवाज" व, दैनिक जागर मराठी चे दिव्यांग पत्रकार नरेंद्र मेश्राम काम आटोपून स्वगावी सायकलने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराने पेट्रोलपंप पालांदूर समोरील इतर जिल्हा मार्गावर धडक दिल्याने पायाचे हाड मोडून जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आल्याचे माहिती होताच व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा, लाखनी तर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात आल्याचे समजताच व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नरेंद्र मेश्राम प्रतिनिधी साप्ताहिक"जनता की आवाज" व दैनिक जागर मराठी हे आवश्यक वस्तू खरेद-'साठी स्वगावाहून पालांदुर / चौरस येथे गेले होते. आवश्यक खरेदी करून गावाकडे परतीचे प्रवासात पेट्रोलपंप पालांदूर समोर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने त्यांचे सायकलला धडक दिल्याने डांब-री रस्त्यावर पडून पायाचे हाड मोडल्याने जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थितांनी त्यांना घरी पोहचविले, कुटुंबीयांनी पत्रकार नरेंद्र मेश्राम या-'ना उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती केले. ते वार्ड क्रमा-क १५ येथे भरती असून त्यांचे पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका शाखा लाखनी येथील पदाधिकाऱ्यांना माहिती झाली. पत्रकार नरेंद्र मेश्राम दिव्यांग असून त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनीचे वतीने त्यांना रुग्णालयात जाऊन आर्थिक मदत करण्यात आली. यावाबद तालुक्यात माहिती होताच व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी या संघटनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या घटनेने पत्रकार संघटनेने मानवतेचा परिचय दिल्याच्या चर्चा होत आहेत.
0 Response to "व्हिओएम' तर्फे अपघातग्रस्त दिव्यांग पत्रकारास अर्थसहाय्य."
एक टिप्पणी भेजें