शासनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्र दुष्काळ ग्रस्त जाहिर करावा व विमा आणि नुकसान भरपाई द्यावी - डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड.
शनिवार, 12 सितंबर 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
बीड :- जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ४५ - ४ ६ दिवसापासून सलग पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन सह इतरही सर्व पिके करपून गेली आहेत, यामुळे शेतक-यांचे १०० % पिके वाया गेलेली आहेत. पाऊस न पडल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहिर करून शासनाने शेतक-यांना विमा लागू करावा व विमा आणि नुकसान भरपाई हेक्टरी किमान १,००, ०००/-( एक लाख रुपये ) नुकसान भरपाई व विमा देण्यात यावा असे अवाहन शासनाला जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले आहे.
सोयाबीन सह सर्व पिके उन्हाने होरपळून गेलेली आहेत. लेकरामाणे जपलेली पिके जमिनीत खत - बी टाकूनही पाऊस नसल्यामुळे वाया गेली. हाता पदरात काहीच पिकं पडले नसल्यामुळे शेतकरी हवालदित झालेला आहे, तेव्हा शासनाने १०० % पिकविमा लागू करून पिकविमा द्यावा व हेक्टरी किमान १,००,०००/-( एक लाख रुपये) नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे.
पाऊस न पडल्यामुळे विहिरीला पाणी नाही, बोअरवेलही आटत आलेली आहेत, त्यामुळे पिण्याची पाण्याची, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्या चिही आजच आडचण झालेली आहे. भविष्यात तर पिण्याच्या पाण्याचीही खुपमोठी अडचण होणार आहे तसेच जनावरांना चारा व मजुरांच्या हाताला काम देण्याचीही गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने जनतेचे प्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्विकारुन सर्व घटकांना न्याय द्यावा अशी मागणी जेष्ठ समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केली आहे.
0 Response to "शासनाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्र दुष्काळ ग्रस्त जाहिर करावा व विमा आणि नुकसान भरपाई द्यावी - डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड."
एक टिप्पणी भेजें