-->
प्राचार्य श्रीपाल सबनीस व कवी साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलन- 2026 मुंबई येथे उत्साहात संपन्न.

प्राचार्य श्रीपाल सबनीस व कवी साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलन- 2026 मुंबई येथे उत्साहात संपन्न.




   नागपूर विभागीय विशेष 
         प्रदीप कडबे 
साप्ताहिक "जनता की आवाज"

मुंबई :- भारतीय सारस्वत मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलन माननीय आमदार मुरजी पटेल सांस्कृतिक केंद्र मरोळ अंधेरी मुंबई येथे दिनांक ०४/१० /२०२६ रोजी हे राज्यस्तरीय कवी संमेलन अतिशय उत्साहात पार पडले.

या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच तेलंगणा व कर्नाटक प्रांतातून आलेल्या कवीने व कवयित्रीने सहभाग घेतला होता सकाळी गप १०ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत चाललेल्या या साहित्य संमेलनास आदरणीय प्राचार्य श्रीपाल सबनीस यांची साहित्य संमेलनाअध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली होती.

व कविसंमेलनाध्यक्ष म्हणून पनवेल चे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे उपस्थिती लाभली होती. या दोन मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवी संमेलनात राज्यातील व परप्रांतातील प्रतिष्ठित व दिग्गज साहित्यिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता या संमेलनामध्ये अनेक कवींनी व कवयित्रीनी सुंदर, उत्कृष्ट व दर्जेदार कविता सादर करून कवी संमेलनाची शोभा वाढविली.अनेक कवींच्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या कविसंमेलनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. 

       या साहित्य संमेलनाचे आयोजन सांगलीचे सुप्रसिद्ध सुरेश सकटे यांनी केले होते.हे कवि संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यानीअतिशय मेहनत घेतली होती.व ते आलेल्या सर्व साहित्यिकांची स्वतः जातीने काळजी घेत होते. दूरवरून आलेल्या साहित्यिकांना कसलीही अडचण होवू नये म्हणून त्यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. चहा ,नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे हे साहित्य संमेलन अतिशय प्रसन्न वातावरणात पार पडले.या साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन मा. विद्या थोरात व चारू शोभा मॅडम यांनी अतिशय सुंदर रीतीने केले. 

तसेच या कवी संमेलनात महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिक विचारवंत व्यंकटेश काकनाटे, डॉक्टर लालासाहेब बनसोडे डॉक्टर कुलकर्णी, गणेश चंदनशिवे,,.आमदार मुर्जी पटेल, एन .ए. कदम, व मच्छिंद्र बोडके, या दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती.

      हे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी दीपक पवार ,भास्कर सर, स्वाती मॅडम, मंगेश रेडीज , वाणी मॅडम सौ अर्चना मॅडम, माननीय शामराव सुतार व इतर अनेकांनी खूप मेहनत घेतली होती. कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "प्राचार्य श्रीपाल सबनीस व कवी साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लेखणी मराठी साहित्य संमेलन- 2026 मुंबई येथे उत्साहात संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article