-->
साकोली येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून 361 तांदूळ भरलेले पोती चोरी.

साकोली येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून 361 तांदूळ भरलेले पोती चोरी.


• 5 लाख 41 हजाराची किमतीचे माल 

संजीव भांबोरे 
साप्ताहिक "जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली येथील शासकीय धान गोदामात चोरी करून चोरट्यांनी 5 लाख 41 हजार .500 रु किमतीची 361 तांदूळ भरलेली पोती लपास केले ही घटना शनिवारी उघडकीस आली.
 असून या घटनेमुळे शासकीय यंत्रणा मध्ये खळबळ उडाली आहे. गोदामातील धान्याची नियमित पाहणी व मोजणी करणारे कर्मचारी दीपक चौधरी राहणार लाखांदूर रोड साकोली हे शनिवारी सकाळी 10.30 वाजता तांदळाच्या साठ्याची पाहणी करण्याकरिता गेले असता त्यावेळी तांदळाची पोती कमी झाल्याचे संशय आला .

सर्व तांदळाच्या पोत्यांची मोजणी केली असता 361 पोती कमी असल्याचे दिसून आले .तपासा दरम्यान मागील बाजूचा शटर चे नट तोडून चोरांनी तांदूळ लपास केल्याचे कळते. सी सी टीव्ही कॅमेरे असताना व नॅशनल हायवे रोड असलेला शासकीय गोदामात चोरी कशी काय झाली आणि एवढा माल एका ट्रकमध्ये भरून कसं काय चोरून नेले एक आश्चर्याची बाब असून या ठिकाणी दहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे. 
तसेच काही माल शोधून साकोली पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आला आहे. माल घेणारे काही मोठे व्यक्ती सुद्धाअडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 आणखी तपास सुरू असून पुन्हा काही आरोपी भेटण्याची शक्यता पोलीस विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पोलीस तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी ठाणेदार व पोलीस उपनिरीक्षक बाकी तपास करत आहेत.

0 Response to "साकोली येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून 361 तांदूळ भरलेले पोती चोरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article