लवारी येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर व्याख्यान.
रविवार, 11 अक्टूबर 2026
Comment
संजीव भांबोरे
साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लवारी येथे अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर व्याख्यान बाल मस्करी गणेश मंडळ करण्यात उत्सव मंडळ लवारीच्या वतीने
करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्ह्याचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी साकोली युवा संघटक अनिल किरणापुरे साकोली तालुका महिला संघटक कल्पना सांगोडे व कार्यकारीनी सदस्य तनुजा नागदेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी सांगितले की जादूटोणा भूत,भानामती तंत्र मंत्र तंत्र ,चमत्कार हे जर कोणी सिद्ध करत असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे 80 लाख रु बक्षीस देण्यात येईल असे आव्हान करण्यात आले हे सर्व थोतांड असून यावर आपण विश्वास ठेवू नये आपल्या गावामध्ये भोंदू बाबा येऊन आपली फसवणूक करतात व लाखो रुपये घेऊन जातात कोणत्या प्रकारचा चमत्कार नसून ते हाथ चालाखीचे प्रयोग असतात किंवा त्यामागे रासायनिक कारण दडलेला असते
या जगात भूत भानामती मंत्र तंत्र येथे अस्तित्व नसून कोणी घाबरण्याचे कारण नाही कोणी कोणाचा नसीब बदलयू शकत नाही चांगले कर्म करा त्याचा फायदा आपल्याला मिळेल असे मत डी जी रंगारी यांनी व्यक्त केले व तसेच नारळातून पैसे काढणे, लिंबातून काळा धागा काढणे लिंबातून रक्त काढणे, फूलांचे कलर बदलविणे ,बिना माचिस ने आग पेटविणे ,कानाने चिठ्ठी वाचणे असे विविध विविध प्रयोग सादर केले
तसेच साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत सादर केले त्याचप्रमाणे जडता कापूर,खाने ,, पेचकस ने तांदूळ भरलेला लोटा उचलणे, असे विविध प्रयोग सादर केले
तसेच साकोली तालुका महिला संघटक कल्पना सांगोळे व तनुजा नागदेवे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले व गीत सादर केले
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक साकोली तालुका युवा संघटक अनिल किरनापुरे यांनी केले तर आभार श्रीरंगे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
0 Response to "लवारी येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन, तसेच जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर व्याख्यान."
एक टिप्पणी भेजें