-->
झाडीपट्टीतील कलावंतांमुळे लोककला जीवंत :- आ. बडोले.

झाडीपट्टीतील कलावंतांमुळे लोककला जीवंत :- आ. बडोले.

• जिल्हास्तरीय लोककला महोत्सवात कलावंतांची मांदियाळी.

युगांतर बारसागडे 
साप्ताहिक "जनता की आवाज" 

सडक अर्जुनी  :- सडक अर्जुनी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची परंपरा जपण्याचे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाडीपट्टीतील कलावंतांनी केले आहे.
आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विषय जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या या कलावंतांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे,असे प्रतिपादन आमदार तथा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. जनजागर कला साहित्य बहुउद्देशीय संस्था शाखा सडक अर्जुनी च्या वतीने तालुक्यातील डुंडा (पांढरी) येथे आयोजित जिल्हास्तरीय लोककला महोत्सवात कार्यक्रमाचे उद्घाटक
म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या महोत्सवात विविध भागातील कलावंतांनी सहभाग घेतला. यावेळी पारंपरिक लोककला, नाट्यकला, गीत-संगीत, गरबा तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. या महोत्सवामुळे परिसरात लोककलेचा जागर झाला असून कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. 

आ. बडोले पुढे म्हणाले, झाडीपट्टीच्या मातीत लोककलेची समृद्ध परंपरा रुजलेली आहे. झाडीपट्टी रंगभूमीने केवळ मनोरंजन केले नाही, तर खऱ्या अर्थाने समाज मनापर्यंत विचार पोहोचविण्याचे काम कलावंतांनी केलं. ग्रामीण भागातील कलावंतांनी प्रतिकूल परिस्थितीतही
आपली कला जपली असून त्यांच्या योगदानामुळे लोककलेची परंपरा आजही टिकून आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सहउदघाटक माजी आ. मनोहर चंद्रिकापुरे, तर मंचावर पं. स. सभापती चेतन वडगाये, जि. प. सदस्य सुधाताई रहांगडाले, डॉ. भूमेश्वर पटले, डी. यू. रहांगडाले, सरपंच उज्वला हटवार, संभाजीराजे जाधव, माजी जि. प. उपाध्यक्ष छायाताई चव्हाण, जिन परमानंद मेश्राम, नाट्य कलावंत दूधराम कावळे, डॉ. अविनाश काशीवार, विलास बागडकर, गजानन परशुरामकर, नाट्य कलावंत भूमाला उईके, ज्ञानेश्वरी कापगते, प्रियंका गायधने, शिवदास साखरे, खुमेश परशुरामकर, उत्तम मेश्राम, बाळकृष्ण ठाकूर, जगदीश टेंभरे, कारिष्माताई भाग्यवान राधेश्याम चौधरी, उज्वलाताई नागपूरकर, नामदेव बेलपांडे ओमकार शेंडे, खेमचंद ठाकरे, राधेश्याम चौधरी सुखदेव कापगते, यांच्यासह विविध क्षेत्रातील कलावंत मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक भावेश कोटांगले यांनी तर संचालन दुर्वासपाल भेलावे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका शाखेचे अध्यक्ष पुण्यशील कोचे सचिव संजय देवरे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कालवंत नागरिक उपस्थित होते.

0 Response to "झाडीपट्टीतील कलावंतांमुळे लोककला जीवंत :- आ. बडोले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article