-->
सहा महिन्यानंतर येरंडी/दरें गावात एसटी बससेवा सुरु..

सहा महिन्यानंतर येरंडी/दरें गावात एसटी बससेवा सुरु..


• आ. राजकुमार बडोले यांची दखल विद्यार्थी व गावकऱ्यांना दिलासा.
युगांतर बारसागडे 
साप्ताहिक 
"जनता की आवाज" 

अर्जुनी-मोरगाव :- तालुक्यातील अत्यंत दुर्गम व आदिवासी भागातील एरंडी दर्रे गावात मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे गावातील बससेवा बंद करण्यात आली होती. 
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत गावातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांनी आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन देऊन बससेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान आ. बडोले यांनी तत्काळ दखल घेत आगार प्रमुखाशी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याने बंद असलेली एसटी बससेवा पुवर्वत झाली.

सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. यामुळे परिसरातील विद्यार्थी व गावकऱ्यांची कोंडी होवून त्रास सहन करावा लागत होता. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दररोज सुमारे चार किलोमीटर पायपीट करून शाळेत जावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. पावसाळ्यात तसेच खराब हवामानात विद्यार्थ्यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान म्यान गावकऱ्यांनी ही बाब आ. राजकुमार बडोले यांच्या

निदर्शनास आणून दिली. रस्ता बांधकाम सुरू असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून पर्यायी मार्गाने बससेवा सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती. या निवेदनाची आ. राजकुमार बडोले यांनी तात्काळ दखल घेत बांधकाम विभाग तसेच एसटी महामंडळ, साकोली यांच्याशी समन्वय साधून बससेवा पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आज (ता. ३) सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर येरंडी/दर्रे गावात विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी एसटी बससेवा उपलब्ध झाली आहे. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बससेवा सुरू झाल्याबद्दल कमल करेश मिरी, ताराचंद चितु भोगारे, मंगेश चितराम सोनवाने, नामदेव करेश मिरी, विष्णुदास उदाराम भोगारे, जितकुमार बिशेश्वर मिरी, खेमराज गुलाब मारगाये, रमेश मोगसु जुनाके, मुकेश सुधराम सोनवाने व सुनील सुदाम परतेकी यांनी आमदार राजकुमार बडोले यांचे आभार मानले.

0 Response to "सहा महिन्यानंतर येरंडी/दरें गावात एसटी बससेवा सुरु.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article